Javed Akhtar : ‘मी नास्तिक पण राम अन् सीता..,’: जावेद अख्तर यांचं विधान
Javed Akhtar : मी नास्तिक आहे पण राम आणि सीता यांना खूप मानतो, माझ्यासारखे जे नास्तिक ते सुद्धा मानत असल्याचं विधान गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी केलं आहे. मुंबईतील दादरमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जावेद अख्तर बोलत होते.
नगर जिल्ह्यातील ९६ महसूली मंडळांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश, मंत्री विखेंची माहिती
जावेद अख्तर म्हणाले, काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत, काही लोक आश्चर्यचकित झाले असतील की, राज ठाकरे यांना बोलवायला अजून कोणी दुसरा सापडला नाही का? याची दोन कारणे आहेत. एकतर आमची चांगली मैत्री आहे आणि दुसरी गोष्ट ही की, मी राम आणि सीता यांना मानतो, असंही ते म्हणाले आहेत.
Air Quality : हवेची गुणवत्ता खालावली! CM शिंदे अॅक्शन मोडमध्ये; प्रदुषण रोखण्याच्या दिल्या सूचना
तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेतरी कमी झालं आहे. शोले जर आज आम्ही लिहिला असता तर त्यातील तो सीन ज्यामध्ये ती मंदिरात जाते आणि मागे धर्मेंद्र उभे असतात. तो सीन मी आज लिहिला नसता आणि सलीम खान यांनीही लिहिला नसता. आज यावर मोठा वाद झाला असता, असंही ते म्हणाले आहेत.
राजकुमार रावचा ‘SRI The Inspiring Journey of Srikanth Bola’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
दरम्यान, या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, लेखक सलीम खान, अभिनेता रितेश देशमुख आणि आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी जय सियारामच्या घोषणाही दिल्या.यावेळी रितेश देशमुख याने सलीम खान आणि जावेद अख्तर यांची मुलाखत घेतली.
Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अलर्ट
यातच बोलताना जावेद अख्तर म्हणाले, ”जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तम यांची गोष्ट करतो, तेव्हा ते राम आणि सीता हेच आहेत. रामायणामध्ये राम आणि त्यांचे भावंड हे नातं सुद्धा अद्भुत आहे. रामाला जो वेगळं करेल तो रावण आहे.
तुम्ही कोणालाही मानत नसाल तरीही तुम्ही हिंदू आहात, हीच हिंदू संस्कृती आहे. यानेच आपल्याला लोकशाहीचा दृष्टिकोन दिला आहे. उलट मीच योग्य आहे आणि सर्वजण चुकीचे आहेत, असा विचार करणं हे चुकीचं असल्याचंही जावेद अख्तर म्हणाले आहेत.