Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अलर्ट
Weather Update : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Weather Update) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही (Diwali 2023) अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं (Rain Alert) संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काल बुधवारी काही जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या दिवसांत पाऊस होत नाही. पिके काढणीची कामे वेगात सुरू असतात नेमक्या त्याचवेळी अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.
हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे, पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसांत शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
Weather Update : राज्यावर अवकाळीचं संकट! दोन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’
राज्यात कुठे आहे पावसाची शक्यता
येत्या 24 तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडू या राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. ही स्थिती पश्चिम-वायव्य दिशेने पुढे जात आग्नेय आणि लगतच्या अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
5 ऑक्टोरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस कायम होते. पण, पाऊस पडला नाही. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात तर पावसाला सुरुवातही झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर अन्य जिल्ह्यात पाऊस झाला तर या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update : येत्या 48 तासांत या भागांमध्ये बरसणार परतीचा पाऊस; हवामान विभागाचा अंदाज