Air Quality : हवेची गुणवत्ता खालावली! CM शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; प्रदुषण रोखण्याच्या दिल्या सूचना

Air Quality : हवेची गुणवत्ता खालावली! CM शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; प्रदुषण रोखण्याच्या दिल्या सूचना

Cm Eknath Shinde On Air Quality : राज्यातलं प्रदुषण रोखण्यासाठी जे लागेल ते करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज्यातील प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. या आढाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

‘सत्तेसाठी पैसा अन् पैशांसाठी सत्ता..,’; प्रियंका गांधींच्या टोलेबाजीवर बावनकुळेंचं उत्तर

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक मशीन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातल्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. पर्यावरण विभागाला दररोज निरीक्षण करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहे. राज्यात सध्या वाढत असलेलं प्रदुषण कमी झालं पाहिजे, प्रदुषणाचं प्रमाण युद्धपातळीवर कमी करण्याबाबतचं सांगितलं आहे, त्यामुळे लोकांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

सध्या राज्यात प्रदुषणामुळे हवा गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. दरम्यान यामध्ये केवळ मुंबई पुणे या शहरांचाच नाही तर राज्यातील अनेक शहरांचा समावेश आहे. हे चित्र धक्कादायक असून यामुळे राज्यामध्ये नागरिकांना श्वास अक्षरशः कोंडला आहे. त्यातून अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.

महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! लोकपालांनी दिले CBI चौकशीचे आदेश

गेल्या 24 तासांच्या हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट (माध्यम) श्रेणीमध्ये गेल्याचं अनेक शहरांमध्ये पाहायाला मिळालं आहे. ही आकडेवारी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने यांनी दिली आहे. यामध्ये अनेक शहरात प्रदूषक पीएम 2.5, पीएम 10 च्या धुलिकणांच्या मात्रेत वाढ झाली आहे. तर पुण्यात NO2 आणि जालन्यात O3 प्रदुषकांची मात्रा वाढली आहे. उल्हासनगर परिसरात हवा गुणवत्ता वाईट श्रेणीत, एक्यूआय 213 वर तर जळगावात एक्यूआय 199 वर आहे.

या परिस्थिती मागे काही कारण देखील सांगण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्वेकडून येणारे वारे, वाऱ्यांची कमी गती, तापमानात होणारी घट आणि डस्ट लिफ्टिंगमुळे हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट (माध्यम) श्रेणीमध्ये गेला आहे. म्हणजे हवा गुणवत्ता बिघडली आहे. त्याचबरोबर प्रदूषित हवेसाठी वाहतूक देखील कारणीभूत आहे. शहरात रोज हजारो लोक आपल्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे हवेतील वातावरणात प्रचंड प्रमाणात धुलीकण पसरतात. असं देखील सांगण्यात येत आहे.

दिवाळीला रात्री 10 पर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी :
राज्यातील प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त इक्बाल सिंग चहल हेही उपस्थित होते. बीएमसी कमिशनरकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत सीएम शिंदे यांनी बीएमसी आणि पोलीस प्रशासनाला विशेष सूचना दिल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी मुंबईत फक्त 7 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी असेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube