‘सत्तेसाठी पैसा अन् पैशांसाठी सत्ता..,’; प्रियंका गांधींच्या टोलेबाजीवर बावनकुळेंचं उत्तर
Chandrashekhar Bawankule News : सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता ही कॉंग्रेसची भूमिका राहिली, असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांना सुनावलं आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांधींनी थेट मोदींवर टीका केली. या टीकेवरुन बावनकुळेंनी प्रियंका गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतून बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Singham 3 : हातात बंदूक अन् चेहऱ्यावर… ; करीना कपूरचा ‘सिंघम अगेन’मधील फर्स्ट लूक प्रदर्शित
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, खरी रामराज्याची स्थापना जी महात्मा गांधींना अपेक्षित होती, ती कॉंग्रेस करु शकली नाही. खरं रामराज्य आणि खरी प्रगती मोदींच्या काळात होत असल्याचाही टोला बावनकुळेंनी यावेळी लगावला आहे.
काय म्हणाल्या होत्या गांधी?
मागील ७० वर्षात देशात काहीच विकास झाला नसता तर मग मोदीजी शाळेत कसे गेले असते? मोदीजी ज्या शाळेत गेले ती शाळासुद्धा कॉंग्रेसच्याच काळात बांधली गेली असणार. मोदीजी ज्या कॉलेजमध्ये गेले ते कॉलेज सुद्धा कॉंग्रेसच्याच काळात बांधले गेले असणार. मोदी हे खरोखरच कॉलेजमध्ये गेले होते की नाही, हे मला माहित नाही. परंतु मोदींकडे जे ‘एन्टायर पॉलिटिकल सायन्स’ विषयाचे पदव्युत्तर पदवीचे प्रमाणपत्र आहे ते नक्कीच कॉंग्रेसने दिलेल्या कॉम्प्युटरवर छापले गेले असणार’ असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला होता.
यावेळी बोलताना बावनकुळे यांनी राज्यातील विरोधकांवरही निशाणा साधल्याचं दिसून आले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवरही त्यांनी खोचक टीका केली आहे. काही लोक मोठ्या नेत्यांवर बोलून मोठे होण्याचे प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच नाना पटोले आणि वडेट्टीवार यांच्यात सुप्तसंघर्ष सुरु असून काही गोष्टी नसतानाही बोलल्या जातात, ज्याने त्यांना प्रसिद्धी मिळत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
तसेच बावनकुळे म्हणाले, ओबीसी सेलची बैठकीसाठी सर्व ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. या राज्यातील ओबीसी समाज जो पिढ्यानपिढ्या या गावात व्यवसाय करायचा, जो १८ पगड जातीमध्ये आहे. त्यांच्यासाठी मोदीजींनी योजना चालू केली आहे. ३० लक्ष लोकांना काम देऊ शकतो अशी विश्वकर्मा योजना आहे. योजनेचा पहिला टप्पा झाला की दुसरा टप्पा ३० लक्ष लोकांना असणार आहे, याची नोंदणी करून जिल्हाधिकारी मान्यता देतील. भाजप ओबीसी मराठा समाज कधी समोरासमोर येणार नाही हे पाहिलं. महाराष्ट्रातला सर्वच वर्ग हे कधीच सहन करणार नाही. भाजप कोणत्याही समाजात वाद होईल याला कधीच खत पाणी घालणार नसल्याचंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.