एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! तानाजी सावंतांचे भाऊ थेट भाजपच्या गळाला, सोलापुरात राजकीय भूकंप

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! तानाजी सावंतांचे भाऊ थेट भाजपच्या गळाला, सोलापुरात राजकीय भूकंप

Shivaji Sawant Will Join BJP In Solapur : राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी (Solapur) रंगणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे घटक पक्ष या निवडणुकांसाठी (Maharashtra Politics) कंबर कसून सज्ज झालेले असतानाच पक्षांतराला देखील उधाण आलंय. अशातच शिवसेना शिंदे गटाला (Eknath Shinde Shiv Sena) सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी (Shivaji Sawant Will Join BJP) आपल्या समर्थकांसह भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, शिवाजी सावंत हे शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचे भाऊ (Tanaji Sawant) आहेत. पक्षांतर्गत गटबाजी आणि नियुक्त्यांमधील नाराजीमुळे अखेर त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढचे 12 तास धोक्याचे! 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट, समुद्रातून उसळणार 4 मीटरच्या लाटा; CM फडणवीसांचं टेन्शन वाढलं

माढा तालुक्यातील तालुका प्रमुख आणि शहरप्रमुखांच्या नियुक्त्या सावंत यांच्याशी चर्चा न करता झाल्यामुळे ते असमाधानी होते. पदाचा राजीनामा दिल्यानंतरही पक्षश्रेष्ठींकडून साधी विचारपूस न झाल्याने त्यांनी हा निर्णय अधिक ठाम केला.

देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट

दरम्यान, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असताना सावंत यांनी त्यांची गुप्त भेट घेतली होती. या चर्चेनंतरच त्यांनी भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली. पुढील दोन दिवसांत फडणवीसांच्या उपस्थितीत सावंत यांच्यासह माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, युवासेना व महिला आघाडीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने भाजपात दाखल होणार आहेत.

अजितदादांचे ‘भावकी प्रेम’ राम शिंदेंच्या जिव्हारी! पवार-शिंदे वादाला नवे वळण?

या घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. विशेषतः महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची ताकद वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिल्या घरी सुखी राहा…

यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी उपरोधिक शैलीत टोला लगावला. “भाजपमध्ये जाणाऱ्यांचा आम्ही सत्कारच करतो, दिल्या घरी सुखी राहा,” असे वक्तव्य करून त्यांनी नाराजी झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा पक्षत्याग एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube