Solapur : आडम मास्तरांनी मोदींसमोर घातला घोळ; ठाकरेंचं नाव घेत फडणवीस-अजितदादांची केली सुट्टी

  • Written By: Published:
Solapur : आडम मास्तरांनी मोदींसमोर घातला घोळ; ठाकरेंचं नाव घेत फडणवीस-अजितदादांची केली सुट्टी

Adam Master Speech In Solapur : सोलापूरमध्ये आज (दि. 19) सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘रे नगर’ गृहप्रकल्पाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या भाषणातच माकचे नेते आणि माजी आमदार आडम मास्तरांनी (Adam Master) नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर फडणवीस आणि अजित पवारांची सुट्टी करून टाकली. या चुकीबद्दल त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता माफीदेखील मागितली आणि त्याचे स्पष्टीकरणही दिले.

‘पात्रता असूनही सुप्रियाला बाजूला ठेवलं पण, कार्यकर्त्यांना संधी दिली’; पवारांनाही नाकारलं घराणेशाहीचं राजकारण

नेमकं काय झालं?

सोलापूरपासून काही अंतरावर उभारण्यात आलेल्या असंघटीत कामागारांसाठी उभारण्यात आलेल्या ‘रे नगर’ प्रकल्पातील घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या या घरांसाठी आडम मास्तरांची मोठी भूमिका आहे. मात्र, कार्यक्रमाला सुरूवात झाल्यानंतर आडम मास्तर भाषणासाठी उभे राहिले.

Ram Mandir : मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजमान, राम मूर्तीचं पहिलं दर्शनही भारावणारं

यावेळी त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भारत सरकार, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैसजी, राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, अं उद्धव ठाकरे असे जाहीरपणे नाव घेतले. मात्र, झालेली चूक त्यांच्या लगेच लक्षात आली आणि त्याबद्दल त्यांनी माफ करा असे म्हणत चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. तसेच ठाकरेंचे नाव का आले याचेदेखील स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे नेहमी येत असल्याने त्यांची नावे तोंडात बसली आहेत. मात्र, अनावधाने झालेल्या या चुकीबद्दल त्यांनी फडणवीसांची माफी मागितली.

कोचिंग सेंटर्सच्या मनमानीला चाप! 16 वर्षांखालील मुलांसाठी नो एन्ट्री; नोंदणीही बंधनकारक

यावेळी आडम मास्तरांनी देशात 67 लाख लोकांचा उदनिर्वाह पेन्शनवर चालतो. मात्र, असंघटित कामगारांची परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे कोठारी कमिटीचा रिपोर्ट येऊन असंघटित कामगारांना 10 हजारांची पेन्शन देण्याची मागणी आडम मास्तरांनी केली. याशिवाय ‘रे नगर’ प्रकल्पात सोलार सिस्टिम बसवण्याची मागणी केली. यामुळे वीजबिल कमी येईल आणि कामगारांच्या मेहनतीच्या पैशांची बचत होण्यास मदत होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube