PM Modi : युवकांना इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी; जोशपूर्ण उदाहरणं देत मोदींनी तरूणांना दिला ‘बूस्टर’

Letsupp Image   2024 01 12T141908.471

PM Modi in Maharashtra Nashik Speech : पंतप्रधान मोदी (PM Modi) आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यामध्ये नाशिक येथून त्यांच्या या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. याठिकाणी ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यांनी मराठीमधून राजमाता जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीने छत्रपती शिवरायांना, रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाईंना घडवलं. अशी महापुरूषांची जोशपूर्ण उदाहरणं देत तरुणांनी असे काम करा की, पुढील काळातील पिढी तुमची न चुकता आठवण काढेल. असं आवाहन करत मोदींनी तरूणांना ‘बूस्टर’ डोस दिला.

Nawazuddin Siddiqui: सैंधव सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अपघात, अभिनेता थोडक्यात बचावला

त्याचबरोबर यावेळी मोदी यांनी महाराष्ट्राने अनेक क्रांतिकारक देशाला दिले. तसेच छत्रपती शिवरायांना, रमाबाई आंबेडकर अहिल्याबाईंना घडवलं. असल्याचं म्हटलं. तसेच तरूण आणि सर्व नागरिकांनी देशातील तीर्थस्थळांवर जाऊन स्वच्छता अभियान राबवण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की, आजचा दिवस नवउर्जेने भरललेला आहे. त्यावेळी मला जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. तसेच काळाराम मंदिरात येण्याची आणि साफसफाई करण्याची संधी मिळाली. असं म्हणत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

नार्वेकरांनी दोन दिवसांपूर्वी सेफ केलेल्या CM शिंदेंची तुफान बॅटिंग; नाशकात मोदींचे ‘नॉन स्टॉप’ कौतुक

आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. हा दिवस त्या महापुरुषाला समर्पित आहे. ज्याने गुलामगिरीच्या काळात भारताला नवीन उर्जेने भरले. स्वामी विवेकानंदांना भेटणे हे माझे भाग्य आहे. तर सध्याच्या युवावर्गाकडे इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे तुमचे कष्ट आणि प्रयत्न जगात देशाचं नाव उंचावेल. असं म्हणत मोदी यांनी तरूणांना प्रोत्साहन दिलं.

Ahmedngar News : रास्तारोको करताच मंत्र्यांचा ताफा थांबला अन् अवघ्या काही तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला

मोदींनी भाषणादरम्यान अमृतकाळात भारताला नव्या उंचीवर नेण्याचा काम युवकांना करायचे असून, भारताची अर्थव्यवस्था जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थेत समाविष्ट झाल्याचे सांगितले. तसेच तरूणांसाठी भाजप सरकारने विविध योजना सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामध्ये ते म्हणाले की, युवकांसाठी आमच्या सरकारने नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेल्या सरकार पेक्षा तिप्पट काम आमच्या सरकारने केलं दहा वर्षात युवकांना मोकळा आभाळ मिळालं.

भारतातील विमानतळ जगातील इतर मोठ्या विमानतळा इतकी सक्षम बनवली. चंद्रयान, आदित्य एल वन, डिजिटल पेमेंट, इंटरनेटचा सहज एक्सेस, अशा अनेक सुविधांचा उल्लेख यावेळी मोदींनी केला. तसेच आपण पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. आपल्याला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनायचं आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यामुळे तरुणांनी असे काम करा की पुढील काळातील पिढी तुमची न चुकता आठवण काढेल. असं आवाहन करत मोदींनी जोशपूर्ण उदाहरणं देत तरूणांना ‘बूस्टर’ दिला.

follow us