नार्वेकरांनी दोन दिवसांपूर्वी सेफ केलेल्या CM शिंदेंची तुफान बॅटिंग; नाशकात मोदींचे ‘नॉन स्टॉप’ कौतुक

नार्वेकरांनी दोन दिवसांपूर्वी सेफ केलेल्या CM शिंदेंची तुफान बॅटिंग; नाशकात मोदींचे ‘नॉन स्टॉप’ कौतुक

PM Modi In Nashik :पंतप्रधान मोदी नाशिकच्या पवित्र भूमीत आले हा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) हा शुभ संकेत आहे. देशातील करोडो नागरिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Temple) बनवण्याचे होते. आज हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केले. मोदी है तो मुमकीन है इतकंच मी म्हणेन. लक्षद्वीपला गेले तर मालदीवला (Maldives) भूकंप झाला. मोदी दूरदर्शी नेते आहेत. त्यांचं नेतृत्व मिळालं हे आपलं भाग्यच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवाते शिंदे बोलत होते. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

Eknath Shinde : ‘मुंब्र्यात फुसके बार आले पण, वाजलेच नाही’ CM शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात दोन दिवसांपूर्वी निकाल दिला. शिंदे गटाचे सगळेच आमदार पात्र ठरले. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोेदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नाशिक येथे आयोजित युवा महोत्सवला त्यांनी हजेरी लावली. एकनाथ शिंदेही उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात पीएम मोदींचे तोंडभरून कौतुक केले.

शिंदे म्हणाले, मोदीजींच्या नेतृत्वात देश वेगाने प्रगती करत आहे. जागतिक पातळीवर भारताचा वेगळाच दबदबा निर्माण झाला आहे. मोदी लक्षद्वीपला गेले पण भूकंप मालदीवमध्ये झाला. आता आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणीही करू शकत नाही. 2047 मध्ये भारत कसा असेल हे स्वप्न साकार करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. युवकच देशाचे भविष्य आहेत. मोदींनी नऊ वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही. असे पंतप्रधान आपल्याला मिळाले हे आपलं भाग्यच आहे.

Maratha Reservation : सरकारच्या हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला

आज भारताचा जगाात नावलौकिक होत आहे. जी 20 परिषद भारतात झाली. चांद्रयान मोहिमही आपण यशस्वी करून दाखवली. या गोष्टी मोदींमुळेच शक्य झाल्या. मोदीजींच्या नेतृत्वात देश वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता भारत लवकरच 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेला देश बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube