Eknath Shinde : भाजपाची चाल, शिंदेंचं मौन; ‘त्या’ व्हिडिओवर थेट उत्तर टाळलं

Eknath Shinde : भाजपाची चाल, शिंदेंचं मौन; ‘त्या’ व्हिडिओवर थेट उत्तर टाळलं

Eknath Shinde on BJP Viral Video : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मात्र काही वेळातच हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. या प्रकारावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis video : ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडिओ भाजकडून डिलिट, भाजपने केली सारवासारव

शिंदे म्हणाले, मी भाजपाने ट्विट केलेला व्हिडिओ पाहिला नाही. आधी व्हिडिओ पहावा लागेल असे मोजकेच उत्तर शिंदे यांनी दिले. आता त्यांनी हा व्हिडिओ पहायचा म्हटला तरी ते शक्य होणार नाही. कारण हा व्हिडिओ ट्विटरवरून डिलीट करण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले की, भाजपने असा व्हिडिओ का ट्विट केला हे त्यांच्या नेत्यांना विचारावे लागेल. तर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, एका ट्विटवरून काहीही संकेत दिले जात नाहीत. यातून कोणताही संदेश दिला गेल्या नाही.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी काल राज्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीत काहीतरी चर्चा झाली असावी. त्यामुळे भाजपने हा व्हिडिओ ट्विट केला असावा.

शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे गटाकडे ४० तर भाजपचे १०५ आमदार होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली होती. यामुळे भाजपचे अनेक नेते नाराज झाले होते. काल अचानक भाजपने फडणवीस यांचा व्हिडिओ ट्विट केला. यात फडणवीस मी पुन्हा येईनचा नारा देत आहेत. फडणवीस यांच्या व्हिडिओनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ajit Pawar यांनी व्यासपीठावरून उठून… मोदींच्या पवारांवरील टीकेवरून देशमुख भडकले

ट्वीटमध्ये नेमकं काय होतं?

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल, असं कॅप्शन देत भाजपने एक व्हिडिओ ट्वीट केला होता. मी पुन्हा येईन… नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन… गावांना जलयुक्त करण्यासाठी, मी पुन्हा येईन… शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…. असं फडणवीस या व्हिडिओत म्हणतांना दिसत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube