Devendra Fadnavis video : ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडिओ भाजकडून डिलिट, भाजपने केली सारवासारव

  • Written By: Published:
Deputy Chief Minister Devendra Fadnavis has assured that action will be taken against all the culprits in Talwade tragedy.

Devendra Fadnavis video : राज्यात काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना वेग आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांची खुर्ची जाणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशाचत देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) मी पुन्हा येईन याचा व्हिडिओ भाजपने (BJP) ट्विट केला. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी एक मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. चर्चांना उधान येताच हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला.

Bharat Jadhav : ‘माझ्यातल्या नटाच्या अस्तित्वासाठी मी…’ भरत जाधव पुन्हा रंगभूमीवर; भुमिकेचीही चर्चा 

शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे गटाकडे ४० तर भाजपचे १०५ आमदार होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली होती. यामुळे भाजपचे अनेक नेते नाराज झाले होते. आता अचानक भाजपने फडणवीस यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यात फडणवीस मी पुन्हा येईनचा नारा देत आहेत. फडणवीस यांच्या व्हिडिओनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्वीटमध्ये नेमकं काय होतं?
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल, असं कॅप्शन देत भाजपने एक व्हिडिओ ट्वीट केला होता.
मी पुन्हा येईन… नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन… गावांना जलयुक्त करण्यासाठी, मी पुन्हा येईन… शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…. असं फडणवीस या व्हिडिओत म्हणतांना दिसत आहेत.

राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांनी सावध पवित्रा घेत हा व्हिडिओ पाहिला नसल्याचे सांगितले. यावर शिंदे गटाच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंत्री उदय सामंत म्हणाले की, भाजपने असा व्हिडिओ का ट्विट केला हे त्यांच्या नेत्यांना विचारावे लागेल. तर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, एका ट्विटवरून काहीही संकेत दिले जात नाहीत. यातून कोणताही संदेश दिला गेल्या नाही.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी काल राज्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीत काहीतरी चर्चा झाली असावी. त्यामुळे भाजपने हा व्हिडिओ ट्विट केला असावा.

दरम्यान, या व्हिडिओमुळं शिंदे गटात अस्वस्थात निर्माण झाल्याचं सांगण्यात येत असून आगामी काळात काय घडामोडी घडतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us