Ajit Pawar यांनी व्यासपीठावरून उठून… मोदींच्या पवारांवरील टीकेवरून देशमुख भडकले

Ajit Pawar यांनी व्यासपीठावरून उठून… मोदींच्या पवारांवरील टीकेवरून देशमुख भडकले

Ajit Pawar : मोदींना शरद पवारांवर टीका केली. तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) त्याच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी पवारांवरील त्या टीकेवर कोणतेही उत्तर दिले नाही. त्यावरून शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी गुरूवारी 26 ऑक्टोबरला अहमदनगर दौऱ्यावर आले होते.

मोदींच्या पवारांवरील टीकेवरून देशमुख भडकले…

मोदींच्या शरद पवारांवरील टीकेवरून अजित पवारांवर टीका करताना देशमुख म्हणाले की, ‘मोदी जेव्हा शरद पवारांवर टीका करत होते. तेव्हा अजित पवार त्यात व्यासपीठावर होते. त्यामुळे पवारांवर टीका होताचं अजित पवारांनी दोन मिनिटं थांबून मोदींना पवारांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळाची अधिक माहिती द्यायला हवी होती. ती माहिती ऐकली असती तर मोदींनी आपल्या वक्तव्यात सुधारणा केली असती. असं देशमुख यांनी म्हटलं. ही प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.

Tata group iphone: भारतात आता टाटा ग्रुपही बनवणार iPhone

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

“आम्ही पवित्र भावनेने शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. पण काही लोकांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण केले. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते केंद्रात अनेक वर्ष कृषीमंत्री होते, तसं तर व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शरद पवारांनी (Sharad Pawar) सात वर्षांत त्यांनी साडे तीन लाख कोटींच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले.

Ahmednagar News : 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला 3 वर्षांची शिक्षा

त्याचवेळी मागच्या सात वर्षांत आमच्या सरकारने एमएसपीवर साडे तेरा लाख रुपयांच्या धान्याची खरेदी केली आहे. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लगावला. ते शिर्डीमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube