Tata group iphone: भारतात आता टाटा ग्रुपही बनवणार iPhone
Tata group iphone: स्मार्टफोन युजर्संमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ आहे. यामुळं आयफोन विक्रीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील लोकसंख्येचा विचार करता भविष्यात आयफोनच्या मार्केटला भरपूर वाव आहे. हे लक्षात घेऊन भारतातील प्रसिध्द टाटा समूह (Tata Group) आता अॅपल कंपनीच्या (Apple Company) आयफोनची निर्मिती करणार आहे.
Sunny leone चा केनेडी झळकणार MAMI मध्ये; कान्स, सिडनीमध्येही झाला बोलबाला
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. टाटा समूह अडीच वर्षांत देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी अॅपलच्या आयफोनचे उत्पादन भारतात सुरू करेल, असं चंद्रशेखर यांनी सांगितलं.
वृत्तानुसार, विस्ट्रॉन फॅक्टरी तोट्यात जात होती. अॅपलच्या अटींनुसार कंपनीला तोटा होत होता. त्यामुळं विस्ट्रॉन कॉर्पोरेशनने देशाच्या दक्षिणेकडील भागात एक प्लांट टाटा समूहाला विकण्याचे मान्य केलं. त्यामुळं टाटा समूह देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी भारतातील पहिला स्वदेशी आयफोन निर्माता बनणार आहे. विस्ट्रॉनच्या बोर्डाने विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडची टाटाला $125 दशलक्षमध्ये विक्री करण्यास मान्यता दिली, असे तैवानच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.
दोन्ही पक्षांद्वारे संबंधित करारांची पुष्टी आणि स्वाक्षरी केल्यावर, करार आवश्यक मंजूरी मिळविण्यासाठी पुढे जाईल. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, विस्ट्रॉन लागू नियमांनुसार आवश्यक घोषणा आणि फाइलिंग करेल, असं या निवदेनात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी विस्ट्रॉन ऑपरेशन्स घेतल्याबद्दल टाटा टीमचे अभिनंदन केले
अहवालानुसार, मार्च 2024 पर्यंत, विस्ट्रॉनची फॅक्टरी सुमारे $ 1.8 अब्ज किमतीचे Apple iPhones बनवेल. जागतिक बाजारपेठेसाठी आयफोन 15 टाटा कारखान्यांमध्ये तयार केला जाईल.
भारतात आयफोनची निर्मिती करणारी टाटा ही पहिली कंपनी ठरणार आहे. ही डील झाल्यानंतर टाटा समूह आयफोन उत्पादनासाठी भारतात मोठं प्लाट सुरू करेल. टाटा कंपनीच्या या निर्णयामुळे भारतात अनेकांना रोजगार मिळेल.