Sunny leone चा केनेडी झळकणार MAMI मध्ये; कान्स, सिडनीमध्येही झाला बोलबाला

Sunny leone चा केनेडी झळकणार MAMI मध्ये;  कान्स, सिडनीमध्येही झाला बोलबाला

Sunny leone : कान्स मिडनाईट स्क्रिनिंगमध्ये प्रीमियर झाल्यापासून सनी लिओनीच्या (Sunny leone) केनेडी या सिनेमाचे देशभरातून कौतुक होत आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हल, ( Kennedy Movie) दक्षिण कोरियाचा बुकियन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हल (BIFAN), आणि Neuchatel इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म (NIFFF), दक्षिण आशियाचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (IFFSA) या यशस्वी स्क्रीनिंगनंतर आता सनीचा चित्रपट केनेडी 29 ऑक्टोबरला प्रतिष्ठित मुंबई अकादमी ऑफ द मूव्हिंग इमेज (MAMI) चित्रपट महोत्सवात पदार्पण करणार आहे.

अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि राहुल भट्ट यांचा समावेश असलेला हा चित्रपट अखंडपणे सस्पेन्स थ्रिलर आहे. चार्ली या गूढ पात्राचे सनीने केलेले चित्रण नक्कीच कमालीचं असून एक अभिनेत्री म्हणून तिच्या उल्लेखनीय अष्टपैलुत्वाचा पुरावा आहे. सनी लिओनी ही केवळ फॅशन आयकॉन आणि स्टार नाही तर आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्यासाठी तयार असलेली एक अष्टपैलू कलाकार देखील आहे.

Kangana Ranaut: भाजपच्या नेत्यावर भडकली कंगना; म्हणाली, ‘महिला केवळ सेक्ससाठी नसतात, तर..’

या बद्दल सांगताना सनी म्हणते, ‘केनेडी’ भारतीय पडद्यावर पदार्पण करत असल्याने मला खूप आनंद झाला आहे. हा खरोखरच एक खास क्षण आहे आणि मी माझ्या भारतीय चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसमोर हा चित्रपट सादर करण्यास आम्ही तयार आहे. या प्रकल्पाचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे, आणि मला आशा आहे की, मी त्याच्या निर्मितीचा एक भाग असताना तुम्हाला तो आवडेल.’

Arjun Rampal : आईच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अर्जुन रामपालची भावूक पोस्ट, म्हणाला…

मे 2023 मध्ये केनेडीने कान्सच्या ‘मिडनाईट स्क्रिनिंग’ मधील यशस्वी प्रीमियरनंतर विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये जगभरातील टूर लाँच केली. जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांसारख्या ख्यातनाम अभिनेत्यांसह ‘कोटेशन गँग’ मधून ती लवकरच तमिळ चित्रपट उद्योगात पदार्पण करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube