Arjun Rampal : आईच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अर्जुन रामपालची भावूक पोस्ट, म्हणाला…
Arjun Rampal : अभिनेता अर्जुन रामपालचं (Arjun Rampal) त्याच्या आईशी खास नातं होतं. त्यामुळे तो नेहमीच आपल्या आईविषयीच्या पोस्ट शेअर करत असतो. यावेळी त्याने त्याच्या आईच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त भावूक पोस्ट शेअर केली आहे. तर गेल्या वेळी त्याने टिचर्स डेच्या निमित्त आईविषयी खास पोस्ट केली होती.
अर्जुन रामपालची भावूक पोस्ट…
अर्जुनने त्याच्या आईच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त भावूक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या आईच्या आठवणींना त्याने उजाळा दिला आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘तु माझ्यावर खुप प्रेम करत होती. मला तुझी खूप आठवण येते. आता पाच वर्ष झाली. तु माझ्यासाठी जे काही केले आहे. त्यासाठी धन्यवाद तसेच तु कित्येक लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. मदत केली. त्यांना बरं केलं. प्रत्येक जण तुझी आठवण काढतो. आय लव्ह यू.’ असं अर्जुन म्हणाल आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
तर गेल्या वेळी त्याने टिचर्स डेच्या निमित्त आईविषयी खास पोस्ट केली होती. त्यात तो म्हटला होता की, यामध्ये त्याने त्याची दिवंगत आई आणि गुरूला श्रद्धांजली वाहिली होती. तर माझी शिक्षिका (Teachers Day) स्वर्गामध्ये राहते. जी वेळो-वेळी माझ्याशी हळूहळू बोलते. ती मला आम्ही सोबत असतानाच्या दिवसांची आठवण करून देते. तेव्हा तिने मला ज्ञानही दिलं आहे. तीने जे काही मिळवलं त्याचा अभिमान बाळगला.
Maratha Reservation : चिखलीकरांनंतर आता दानवेंना दणका; ताफ्यावर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न
मात्र नम्र देखील राहीली. तसेच तिच्या विश्वासांवर ठाम राहाली. ज्यांच्या सोबत असायची त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणायची. ती खूप विचारी, दयाळू आणि प्रेमळ होती. तुझे ते गुण कधीही संपू नये. कुणाचीही तुलना स्वतः शी करू नये. प्रत्येक जण वेळेनुसार बदलत असतो. पुढे जात असतो. तु माझा मुलगा आहेस. विद्यार्थी आहेस. माझा गौरव आहेस. असं ती म्हणायची मी आता तिच्या या विचारांच्या माध्यामातून जगत आहे.
Khakee: तब्बल 20 वर्षांनी येणार ‘खाकी’चा सीक्वल; बिग बींसह दुसऱ्या भागात कोण- कोण झळकणार?
अर्जुनची आई ग्वेन रामपाल या इंग्रजी लिटरेचर आणि इतिहासाच्या प्रध्यापिका होत्या. मात्र आता त्यांचे निधन झालेले आहे. त्यामुळेअर्जुन रामपाल दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त (Teachers Day) आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत असतो. सोशल मीडियावर त्याबद्दल पोस्ट करत असतो. या पोस्टमध्ये देखील अर्जुनने आपल्या आईबद्दल खास भावना व्यक्त केल्या आहेत. कारण आपली पहिली गुरू ही आपली आई असते.