50 व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनला Arjun Rampal पत्नीनंतर गर्लफ्रेंडनेही दिला दुसऱ्या मुलाला जन्म

  • Written By: Published:
50 व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनला Arjun Rampal पत्नीनंतर गर्लफ्रेंडनेही दिला दुसऱ्या मुलाला जन्म

Arjun Rampal Girlfriend Gabriella: अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि त्याची गर्लफ्रेंड मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella) दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. गॅब्रिएलाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. या जोडप्याला ३ वर्षांचा एक गोंडस मुलगा देखील आहे. आता पुन्हा त्यांच्या घरी छोट्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Rampal (@rampal72)


तसेच गॅब्रिएलाने २० जुलै रोजी मुलाला जन्म दिला आहे. अर्जुनने सोशल मीडियावर (Social media) याविषयी माहिती दिली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि त्याच्या गर्लफ्रेंडने त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. परंतु दोघांनी अजून देखील लग्न केले नसळायचे दिसून येत आहे. अभिनेत्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून दोन मुली देखील आहेत.

म्हणाला की, “मला आणि माझ्या कुटुंबाला आज एका सुंदर मुलाचा आशीर्वाद मिळाला. आई आणि मुलगा दोघे देखील सुखरूप आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद,” असं कॅप्शन अर्जुनने यावेळी दिले आहे. सोबतच त्याने #20.07.2023 व #helloworld असे हॅशटॅग देखील वापरले आहे. यासोबत त्याने hello world लिहिलेल्या एका टॉवेलचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

अर्जुनच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत. परंतु गॅब्रिएलाने मे महिन्यामध्ये मॅटर्निटी काही फोटो पोस्ट करत दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. अर्जुन आणि  गॅब्रिएला दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत.

अर्जुन रामपाल आणि त्याची पहिली पत्नी मेहेर जेसिका यांनी २१ वर्षांच्या संसारानंतर २०१९ मध्ये घटस्फोटघेण्यात आला होता. तेव्हापासून अर्जुन गॅब्रिएलाला डेट करत असल्याचे समोर आले आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुली झाल्याची माहिती आहे, तर गर्लफ्रेंडपासून एक ३ वर्षांचा मुलगा होता आणि आता ते दुसऱ्यांदा एका गोंडस मुलाचे आई-बाबा झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube