Ratan Tata : मुख्यमंत्र्यांकडून रतन टाटांना महाराष्ट्राचा पहिलाच ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान
Ratan Tata Udyogratn Puraskar : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata ) यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांच्या हस्ते हा पुरस्कार टाटा यांना त्यांच्या कुलाबा निवासस्थानी प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राज ठाकरे घरातून निघाले ही काय ‘ब्रेकिंग न्यूज’ होऊ शकते का? गौरव सोहळ्यात पत्रकारांवरच घसरले
गेल्या काही दिवसांपूर्वी हा पुरस्कार त्यांना जाहिर देण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
Industrialist Ratan Tata was conferred with the Udyog Ratna award at his residence, by Maharashtra CM Eknath Shinde and Dy CMs Ajit Pawar and Devendra Fadnavis as he won't be attending the award ceremony tomorrow due to his ill health pic.twitter.com/O9DScLjupw
— ANI (@ANI) August 19, 2023
या पुरस्कार प्रदान कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने उद्योगरत्न पुरस्काराची सुरूवात करण्यात आली. पहिल्यांदाच हा पुरस्कार रतन टाटा यांना देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्यांनी तो स्विकारला त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे. त्यांचं प्रत्येक क्षेत्रात योगदान आहे. टाटा म्हणजे विश्वास लोकांच्या मनात तो विश्वास त्यांच्याबद्दल आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
गडकरींच्या मंत्रालयावर ‘कॅग’चे आक्षेप का? बावनकुळेंनी विरोधकांना दिलं टेक्निकल नॉलेज
राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याच्य दृष्टीने उद्योगांना सर्व प्रकारच्या मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या मैत्री कक्षाच्या कार्यवाहीत सुधारणा करणारे महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. यावेळी चर्चेला उत्तर देताना सामंत यांनी ही माहिती दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
#WATCH | Ratan Tata's and Tata Group's contribution to the country is immense. I thank him for accepting this award given by the Maharashtra government: CM Eknath Shinde on the Udyog Ratna award to industrialist Ratan Tata pic.twitter.com/LysgCzImnO
— ANI (@ANI) August 19, 2023
रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. उद्योग आणि व्यापार या क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी सन 2000 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे. नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकाने त्यांना व्यवसायातील 25 प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचे जाहीर केले होते. मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.
रतन टाटा यांना यावर्षीच ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले होते. या व्यतिरिक्त टाटा यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.