गडकरींच्या मंत्रालयावर ‘कॅग’चे आक्षेप का? बावनकुळेंनी विरोधकांना दिलं टेक्निकल नॉलेज
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मंत्रालयासंबंधी कॅगने (CAG Report) आपल्या अहवालात काही गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. ज्यामुळे गडकरी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा सगळा प्रकार गडकरींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यांच्या या टीकेवर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले. बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सामना वृत्तपत्रातून देवेंद्र फडणवीस यांच्यवर केलेल्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेला दावा खोडून काढला. तसेच गडकरी यांच्या मंत्रालयासंदर्भातील कॅग अहवालावरही भाष्य केले.
‘आता ‘सामना’ची आग थांबवावीच लागेल’; फडणवीसांवरील टीका बावनकुळेंनाही झोंबली!
महाराष्ट्र असो की देशातील सरकार असो एखाद्या विकासकामाच्या किंमती वाढल्या तर काही त्या आक्षेपावर कॅग किंवा महाराष्ट्र ऑडिट डिपार्टमेंट असो त्याचे परिच्छेद येतात. त्या परिच्छेदाला कंपलायन्स करावं लागतं. त्यात खर्च का वाढला, याचे उत्तर दिले की ते परिच्छेद (पॅराग्राफ) डिलीट केले जातात. नितीन गडकरी यांना कुणीही अडचणीत आणू शकत नाही. संभ्रम तयार करण्यासाठी विरोधीपक्ष नेते बोलत आहे. ऑडिट किंवा कॅगचे परिच्छेद उत्तरे दिल्यावर कमी होतात, म्हणून त्याचा अर्थ भ्रष्टाचार झाला असं होत नाही, असे बावनकुळे म्हणाले.
2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर (Vijay Wadettiwar) यांनी शिंदेंबाबत केलेल्या दाव्यामुळे शिंदेंचे टेन्शन पुन्हा वाढलं आहे. सप्टेंबर महिन्यापासून मुख्य खुर्चीपासून राज्या बदलाला सुरूवात होईल. राज्यात सत्ताबदल होणार असल्याचे मी ठासून सांगतो असे म्हणत शिंदे सप्टेंबर महिन्यात पदावरून पायउतार होतील, असा खळबळजनक दावा केला होता.
Sanjay Raut : भाजपमधील 70 टक्के लोक ‘डुप्लिकेट माल’; गडकरींच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला
2024 पर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका अजित पवारांसोबत आम्ही लढणार आहोत. ते आताच विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना काहीतरी बोलावचं लागतं म्हणून ते बोलतात. 200 च्या वर बहुमत असलेलं आमचं सरकार आहे. आमच्या नेतृत्वाने हे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे विरोधकांचे स्वप्न साकार होणार नाही, अस टोला बावनकुळे यांनी लगावला.
प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढणार
आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांना ताकद देण्याचे काम करणार आहोत. पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक एक वर आणण्यासाठी प्रचंड ताकतीने आगामी काळात महायुतीला प्रचंड मदत मिळावी, म्हणून आमचं काम सुरू झालं आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.