Sanjay Raut : भाजपमधील 70 टक्के लोक ‘डुप्लिकेट माल’; गडकरींच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला
Sanjay Raut on BJP : ‘नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी सांगितलं की, भाजपचं दुकान जोरात आहे. पण जो ओरिजीनल माल आहे. तो बाहेर आहे. आम्ही ही ते म्हणतोय. आज महाराष्ट्र भाजपमधील 70 टक्के लोक हे डुप्लिकेट माल आहे.’ अशी टीका नितिन गडकरींच्या वक्तव्याचा दाखला देत खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Box Collection: अभिषेक बच्चनच्या ‘घूमर’ची निराशाजनक कामगिरी; पहिल्या दिवशी कमावले फक्त…
काय म्हणाले संजय राऊत?
नितिन गडकरी यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याने सत्य परिस्थितीविषयी परखड मत व्यक्त केलं आणि ते सत्य आहे. की, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि ज्या पक्षासोबत आम्ही 25 वर्ष काढली तो भाजप पक्ष कुठे आहे? ती एनडीए नितीन गडकरी यांनी सांगितलं की, भाजपचं दुकान जोरात आहे. पण जो ओरिजीनल माल आहे तो बाहेर आहे.
आम्ही ही ते म्हणतोय. आज महाराष्ट्र भाजपमधील 70 टक्के लोक हे डुप्लिकेट माल आहे. हे भाजपचेचे नेते म्हणत आहेत. ज्या विचारधारेबरोबर आम्ही आलो तो भाजप आज दिसत नाही. तीच खंत गडकरींनी व्यक्त केली आहे. तीच व्यथा त्यांच्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे नितीन गडकरींचं अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी सत्य बोलण्याची हिंमत दाखवली.
फडणवीसांवरील टीकेवर राऊत म्हणाले…
देवेंद्र फडणवीस हे सद्गृहस्थ आहेत. ते गडकरी म्हणाले त्याप्रमाणे जुन्या भाजपशी संबंधित आहेत. तर आम्ही त्यांना फक्त आरसा दाखवला. फडणवीास म्हणाले की, आमच्याशी बेईमानी केली म्हणून आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली. मात्र भाजपच्या वरिष्ठांनीच शिवसेनेशी बेईमानी केली म्हणून आम्ही त्यांना आरसा दाखवला. तुम्ही बेईमानी केल्याने तुमच्यावर डुप्लिकेट माल घेऊन बसण्याची वेळ आली आहे. त्यात बावनकुळेंना मिरच्या झोंबायचं कारण काय? असा सवाल देखील राऊतांनी केला. तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी नाही. तर सध्याच्या डुप्लिकेट हाय कमांडने युती तोडली म्हणून ही वेळ आली.
पुढे कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्या संदर्भातील घटनेवर राऊत म्हणाले की, त्यावर आम्ही माहिती घेत आहोत. जर असेल तर महाराष्ट्र सरकार झोप कढत आहे का? त्यावर त्यांना विचारा. इंडिया बैठकी बाबत आम्ही रोज सांगत आहोत. जोरात तयारी सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या देखरेखेखाली तयारी सुरु आहे. तुम्हाला कळेल कशी तयारी केली आहे? 6 राज्यांचे मुख्यमंत्री येत आहेत. त्यामुळे सरकार सोबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे सरकारला त्यांना सुरक्षा द्यावी लागेल. महाविकास आघाडी जागावाटपाला वेळ आहे. त्याची चिंता करू नका. 48 जागांचं वाटप व्यवस्थित जागावाटप होईल. खरी चिंता एक डाऊट फुल दोन हाफ यांना असायला पाहिजे.