TV Actor Pawan Death: वयाच्या 25 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास; निधनाच्या काही तासांपूर्वी त्याचं…
TV Actor Pawan Death: साऊथच्या मनोरंजन क्षेत्रात एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेता पवन सिंह (Pawan Singh) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. (Pawan Death) तो हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता आहे. अवघ्या 25 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याचे १८ ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले.
मुंबईमधील त्याच्या निवासस्थानी पवनने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. पवन हा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील रहिवासी आहे. हरिहरपुरा गावातील नागराजू आणि सरस्वती यांचा तो मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, पवनचा मृतदेह मुंबईहून त्याच्या मूळ गावी मांड्या या ठिकाणी आणला जाणार आहे. यानंतर त्याचे कुटुंबीय अंतिम संस्कार करणार आहेत.
View this post on Instagram
मूळचा साऊथचा असून पवन कामानिमित्त आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत होता. तो हिंदी आणि तमिळमधील अनेक सीरियलमध्ये झळकला आहे. त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हृदयविकाराचा झटका हे कारण वगळता त्यांच्या मृत्यूच्या तपशीलाबद्दल अद्याप कोणती देखील अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
Shahrukh Khan ने बॉलिवूडला उद्धवस्त केलं; विवेक अग्निहोत्रींचे गंभीर आरोप
मंड्याचे आमदार एचटी मंजू, माजी आमदार केबी चंद्रशेखर, माजी मंत्री केसी नारायण गौडा, माजी आमदार बी प्रकाश, टीएपीसीएमएसचे अध्यक्ष बीएल देवराजू, काँग्रेस नेते बुकानाकेरे विजया रामेगौडा, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बी नागेंद्र कुमार, जेडीएस नेते अक्कीहेब्बालू रघु, युवा जनता दलाचे अध्यक्ष कुरुबहल्ली नागेश आणि चाहत्या वर्गांनी पवनच्या निधनाबद्दल मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त करत आहे.