धुरंधर द रिवेंजच्या रिलीजआधीच धुरंधर पुन्हा एकदा होणार जगभरातील चित्रपटगृहांत री रिलीज

धुरंधर हा चित्रपट त्याच्या सीक्वेल धुरंधर: द रिव्हेंज च्या प्रदर्शनापूर्वी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (1)

Dhurandhar will once again be re-released in theaters around the world : Jio Studios आणि B62 Studios यांच्या बहुचर्चित फ्रँचायझीमधील पहिला भाग धुरंधर हा चित्रपट त्याच्या सीक्वेल धुरंधर: द रिव्हेंज च्या प्रदर्शनापूर्वी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘धुरंधर : द रिवेंज’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या आधी ‘धुरंधर’ हा चित्रपट 13 मार्चपासून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित केला जात आहे.

‘धुरंधर’ या चित्रपटाची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे या री-रिलीजमधून दिसून येत आहे. या विशेष पुनःप्रदर्शनाअंतर्गत जगभरात सुमारे 500 स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जाणार आहे. त्यापैकी भारतात सुमारे 250 स्क्रीनवर 12 मार्चपासून चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून परदेशात जवळपास 250 स्क्रीनवर 13 मार्चपासून प्रेक्षकांना तो पाहता येणार आहे.

या फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी ही एक खास संधी मानली जात आहे. कारण ज्या चित्रपटाने स्पाय-अ‍ॅक्शन प्रकाराला नवी ओळख दिली, तो चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच त्याचा पुढचा भाग ‘धुरंधर : द रिवेंज’ प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना या कथानकाचे दोन्ही भाग सलग अनुभवता येणार आहेत.

भारतात काही मोठ्या चित्रपटांचे पुनःप्रदर्शन यापूर्वी झाले असले तरी हिंदी चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा पद्धतीने री-रिलीज होणे तुलनेने दुर्मिळ मानले जाते. त्यामुळे ‘धुरंधर’चा हा पुनःप्रदर्शनाचा निर्णय फ्रँचायझीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जगभरात या चित्रपटाबाबत असलेली प्रचंड उत्सुकता यामुळे स्पष्ट होत आहे. विशेषतः उत्तर अमेरिकेतच सुमारे 185 स्क्रीनवर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे.

Strait of Hormuz : भारताला यश, इराणशी चर्चा अन् होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दाखल

दरम्यान, ‘धुरंधर : द रिवेंज’ या चित्रपटाचे विशेष प्रीमियर शो 18 मार्च रोजी अमेरिका आणि कॅनडामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. म्हणजेच जागतिक प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच हे शो होणार आहेत. हे प्रीमियर प्रामुख्याने प्रीमियम लार्ज फॉर्मेट (PLF) स्क्रीनवर दाखवले जाणार आहेत. या स्क्रीनवर प्रचंड मोठा पडदा, डॉल्बी एटमॉससारखी दमदार ध्वनी व्यवस्था, अत्याधुनिक प्रोजेक्शन आणि आलिशान आसनव्यवस्था असते. सामान्यतः अशा प्रकारच्या फॉरमॅटचा वापर मोठ्या हॉलीवूड चित्रपटांसाठी केला जातो. विशेष म्हणजे या मिड-वीक प्रीमियर शोच्या अनेक तिकिटांची आगाऊ बुकिंगच पूर्ण झाली आहे, ज्यामुळे चित्रपटाबद्दलचा प्रेक्षकांचा उत्साह स्पष्ट दिसून येतो.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर : द रिवेंज’च्या ट्रेलरलाही जगभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ आणि वितरक देखील या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. पहिल्या भागाचे पुनःप्रदर्शन आणि त्यानंतर काही दिवसांतच सीक्वेल प्रदर्शित होणार असल्याने जगभरातील प्रेक्षकांना पुन्हा एकदा या मालिकेतील थरार, भव्यता आणि रहस्याचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

‘धुरंधर : द रिवेंज’ हा चित्रपट आदित्य धर यांनी लिहिला, दिग्दर्शित केला आणि निर्मितीही केली आहे. ज्योती देशपांडे आणि लोकेश धर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. Jio Studios प्रस्तुत आणि B62 Studios निर्मित हा हाय-ऑक्टेन स्पाय-अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us