Maratha Reservation : सरकारच्या हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarang) उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची तब्येत ढासाळत चालली आहे. त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. शिवाय सत्तेतील अनेक आमदार-खासदारांनी आरक्षणाला पाठिंबा देत राजीनामे दिले आहेत. त्यामुळं राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला राजभवनावर गेले आहेत. त्यामुळं चर्चंना उधाण आलं आहे.
Maratha Reservation : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं
40 दिवसांची मुदत दिल्यानंतर अद्याप आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या आंदोलनाला चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आरक्षणावरून राज्याच्या कानोकोपऱ्यात वातावरण तापलं आहे. सध्या मराठा आंदोलननाने उग्र स्वरुप धारणं केलं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके यांचे बंगले पेटवून देण्यात आले. राज्यातील परिस्थिती हात बाहेर जात असल्याचं दिसतं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे हे तात्काळ राज्यपालांची भेट घ्यायला गेले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे राज्यपालांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे एकटेच गेले आहेत. अजित पवार आजारी आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक ‘सागर’ बंगल्यावर सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणाबाबत राज्यपालांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीडसह अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला आहे. सत्ताधारी आमदार आणि नेते आंदोलकांच्या निशाण्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. आपल्या सहकाऱ्यांसी चर्चा केल्यानंतर सीएम शिदे हे राज्यपालांच्या भेटीला गेल्याचं सांगितलं जातं. आज आणि उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत होणारे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांना समजावून सांगणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, सर्व परिस्थिती जाणून घेतल्यानंतर राज्यपाल विशेष अधिवेशनाची सुचना करू शकतात. त्यामुळं मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
तर उद्या मंत्रीमंडळाची बैठक पार पडत आहे. मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळही उद्या मुंबईत चर्चेसाठी येणार असल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. त्यामुळं मराठा आरक्षणसाठी काही मोठ्या घडामोडी ठरतात का, हेच पाहणं महत्वाचं आहे.