राजीनामा सत्र सुरूच! मराठा आरक्षणासाठी हेमंत गोडसेंनी दिला राजीनामा, शिंदे गटाला मोठा झटका

  • Written By: Published:
राजीनामा सत्र सुरूच! मराठा आरक्षणासाठी हेमंत गोडसेंनी दिला राजीनामा, शिंदे गटाला मोठा झटका

Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरता आंदोलन केली जात आहे. राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे. राजकीय नेत्यांना गावांमध्ये प्रवेश बंदी केली आहे. दिवसेंदिवस मराठा समाजाचा रोष वाढत आहे. हा रोष पाहून अनेक राजकीय नेत्यांनी आरक्षणाचं समर्थन करत आंदोलनाला पाठिंबा दिला. तर अनेक मराठा आमदार – खासदार आपले राजीनामे देत आहेत. आता शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनीही आपला राजीनामा दिला.

Avneet Kaur : अवनीत कौरच्या ट्रान्सपरेंट ड्रेसनं वाढवलं तापमान… 

मनोज जरांगे यांनी चाळीस दिवसांची मुदत देऊनही आरक्षण न मिळाल्यानं पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेक ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने नाशिकमधील छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ गेल्या ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. दोन दिवसांपासून आंदोलकांपैकी नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.

दरम्यान, आज आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेले शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना आंदोलकांनी जाब विचारला आणि समाजाच्या हितासाठी राजीनामा देण्याची मागणी केली. आंदोलनस्थळी गोडसे गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. समाजाच्या हितासाठी तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला आम्ही निवडणूक असं यावेळी त्यांनी सांगण्यात आलं. यानंतर गोडसे यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाऊळे उचलावातीत अशी मागणी केली.

नाशिकमध्ये दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत असून दीडशेहुन अधिक गावात राजकीय नेते आणि मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर मराठा समाजाची आक्रमकता पाहून अनेक मंत्र्यांचे दौरे व कार्यक्रम रद्द होत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं. मात्र आता त्यांच्याच पक्षाचे खासदार असलेल्या गोडसेंनी राजीनामा दिला आहे. त्यामुळं सरकार आरक्षणविषयी काय भूमिका घेते हेच पाहण महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube