मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचाच पहिला राजीनामा; सत्ताधारी गटात नाराजी वाढली
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंगच पेटल्याचं दिसून येत आहे. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून राज्यभरातील अनेक गावांत राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याचदरम्यान खासदार आमदारांच्या राजीनाम्याचं सत्रही सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीडचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील पत्रच आमदार पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना धाडलं आहे.
मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देणार! मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला सरकारचा प्लॅन
लक्ष्मण पवार यांनी पत्रात काय लिहिलं?
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणचाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावरुन समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मराठा आरक्षणासाठीच मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचं लक्ष्मण पवार यांनी म्हटलं आहे.
समर्थ रामदास नसते, तर शिवराय झाले नसते; मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वादग्रस्त विधान
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच याआधी नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हेमंत पाटील पहिले खासदार ठरले. त्यानंतर आता आमदारांमधून लक्ष्मण पवार हे पहिले आमदार ठरले आहेत.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज…; भाजप खासदाराने राज्य सरकारला कोंडीत पकडलं
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. मराठाआरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांकडे पहिला राजीनामा पडला आहे. लक्ष्मण पवार हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याती आमदार आहेत. खासदार आमदार राजीनामा देण्याच्या सत्रावर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून लोकसप्रतिनिधींनी राजीनामा देण्यापेक्षा एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे, राजीनामा देऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे.
नूकतीच बीडचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या विधानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये सोळंके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याबद्दल विधाने केल्याने संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी सोळंके यांच्या निवासस्थानी हल्लाबोल करीत घरासह गाडीच जाळून टाकली असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलन राज्यात चांगलचं चिघळत असल्याचं दिसून येत आहे.