ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज…; भाजप खासदाराने राज्य सरकारला कोंडीत पकडलं

  • Written By: Published:
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज…; भाजप खासदाराने राज्य सरकारला कोंडीत पकडलं

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची मागणी मनोज जरंगे पाटील करत आहेत. या मागणीला आमचा विरोध आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. जरांगे हे आरक्षण देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवत आहेत, त्यांना आरक्षण द्यावं. पण, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. चुकूनही असे घडलं तर तेली समाज ओबीसी आरक्षणासाठी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजप खासदार व प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी दिला.

IND vs ENG: हार्दिक पंड्या विश्वचषकात परतणार का? समोर आली मोठी अपडेट 

गेल्या दीड महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे आरक्षणसाठी उपोषण करत आहे. त्यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. त्यामुळं त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. राजकीय नेत्यांना राज्यभरात गावबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी मंत्रीमंडळ उपसमितीची मुख्यमंत्री शिंदेंनी बैठक बोलावली.

याघडामोडीनंतर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची आज नागपूरला विभागीय बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषेद खासदार तडस बोलत होते. यावेळी त म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या दबावाखाली सरकारने ओबीसी समाजावर अन्याय करणारा निर्णय घेऊ नये आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये. यासंदर्भातील मोठा प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आला. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास तेली समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. त्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्यभर विभागनिहाय बैठका घेत आहे, असं तडस म्हणाले.

तडस म्हणाले, सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के करावी, आरक्षणात वाढ करावी, ओबीसी समाज व तेली समाजाला विधानसभेत जागा द्याव्यात आणि लोकसभेचे राजकीय प्रतिनिधित्व द्यावं, असे पाच महत्वाचं ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले.

ते म्हणाले की, जरांगे पाटलांच्या मागणीला आमचा विरोध आहे. ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्व जाती याला विरोध करत आहेत. राज्य सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मात्र जरंगे पाटील यांचा सरकारवर जास्त दबाव वाढणार नाही, याचीही काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्यभर विभागनिहाय बैठका घेत आहे. महाराष्ट्रात तेलघाणा महामंडळ स्थापन करण्याची आमची मागणी आम्ही रेटून धरू, असं तडस म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाची मागणी आणि या मागणीला ओबीसीमधून होणार विरोध यामुळं राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली असून, सरकार काय निर्णय घेते हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube