Singham 3 : हातात बंदूक अन् चेहऱ्यावर… ; करीना कपूरचा ‘सिंघम अगेन’मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

Singham 3 : हातात बंदूक अन् चेहऱ्यावर… ; करीना कपूरचा ‘सिंघम अगेन’मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

Kareena Kapoor Look Singham 3 Release: ‘सिंघम 3’ (Singham 3) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘सिंघम 3’ची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची खूपच प्रतीक्षा करत आहेत. (Kareena Kapoor Shared Singham 3 First Look Poster) आता हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असून या सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक सोशल मीडियावर (social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. आता या सिनेमातील बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूरचा (Kareena Kapoor) फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)


‘सिंघम 3’ या (Kareena Kapoor Upcoming Movies) सिनेमात करीना कपूर मुख्य भूमिकेत चाहत्यांना बघायला मिळाला आहे. आता अभिनेत्रीचा या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर करत करीनाने लिहिलं आहे की, “सैन्यात सामील होण्याची आता पुन्हा वेळ आली आहे”. या पोस्टरमध्ये करीनाच्या हातात बंदूक आणि चेहऱ्यावर धगधगती आग बघायला मिळत आहे.

करीनाचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. करीनाच्या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अॅक्शन मोडमध्ये पुन्हा एकदा, आली रे आली अवनी बाजीराव सिंघम आली, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, कमाल पोस्टर, बेबोचं कमबॅक, क्वीन अशा कमेंट्स सध्या चाहते करत असल्याचे दिसत आहे.

रोहित शेट्टीने (Rohit Shetty) करीनाचा पहिला लूक शेअर करत सांगितले आहे की, “सिंघम’ची खरी ताकद… अवनी बाजीराव सिंघम. 2007 मध्ये आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं. ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल 3’, ‘सिंघम रिटर्न’ असे ब्लॉकबस्टर सिनेमे आम्ही दिले आहेत. आता चौथ्या सिनेमासाठी सज्ज होणार आहोत. या 16 वर्षांमध्ये काही बदल नाही. करीना त्यावेळी जशी होती साधी, सरळ, प्रेमळ आणि मेहनती तशीच आज देखील आहे”. ‘सिंघम 3’ या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.

Harshvardhan Kapoor Birthday: ‘थार’ फेम हर्षवर्धन कपूरचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

करीना कपूरचा ‘जाने जान’ हा सिनेमा गेल्या काही दिवसापासून चाहत्यांच्या भेटीला आला होता. आता करीनाचे ‘सिंघम 3’सह ‘द क्रू’,’वीरे द वेडिंग 2′,’द बकिंघम मर्डर्स’ आणि ‘तख्त’ हे सिनेमे चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. करीनाचे चाहते या सिनेमांची मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube