Priyanka Gandhi : PM मोदींवरील टीका भोवली; निवडणूक आयोगाने प्रियंका गांधींना धाडली नोटीस

Priyanka Gandhi : PM मोदींवरील टीका भोवली; निवडणूक आयोगाने प्रियंका गांधींना धाडली नोटीस

Priyanka Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या या टीकेची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रियंका गांधी यांना नोटीस पाठविल्याचे सांगण्यात आले. 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत या नोटीसीला उत्तर द्यावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने (Election Commission) दिल्या आहेत. राजस्थानातील एका सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रियंका गांधी यांना ही नोटीस धाडली आहे. 

कॉंग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, 19 जणांचा समावेश, धारिवाल आणि जोशी यांना डच्चू?

राजस्थानातील दौसा येथे प्रियंका गांधी यांनी पीएम मोदींवर निशाणा साधताना मोदी यांनी मंदिरात केलेल्या दानाचा लिफाफा फोडल्यानंतर त्यात फक्त 21 रुपये मिळाले, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यासोबत त्यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओही जोडण्यात आला होता. निवडणूक आयोगान प्रियंका गांधी यांना आचारसंहितेतील तरतुदींचा आठवण करून दिली. पक्ष आणि उमेदवारांनी खासगी जीवनातील पैलूंवर टीका करणे टाळावे, असे या नोटीसीत म्हटले आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी 20 ऑक्टोबर रोजी एका भाषणादरम्यान वक्तव्य करत आचारसंहितेचे उल्लंघन केले असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. प्रियंका गांधी आचारसंहितेपेक्षा मोठ्या आहेत का, असा सवाल उपस्थित करत आपण खोटे बोलू शकत नाहीत आणि धार्मिक भावनेने प्रचार केला जाऊ शकत नाही, असे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी तक्रार दाखल करताना म्हटले होते.

jammu kashmir मध्ये भारतील लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, पाच दहशतवाद्यांचा खात्मा

राजस्थानसाठी काँग्रेसची तिसरी यादी 

काही दिवंसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली होती. त्यानंतर कॉंग्रेसने राजस्थानमधील निवडणूकांसाठी दोन उमदेवारांच्या याद्या जाहीर केल्या होत्या. एकूण ७६ उमदेवारांच्या यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 33 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी 19 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

गुरुवारी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या यादीत दोन दिवसांपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आमदार शोभाराणी कुशवाह यांना धौलपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या सध्या धौलपूरचे आमदार आहेत. बसपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले आमदार वाजीब अली यांना नगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज