कॉंग्रेस सोबत घेत नाही म्हणून भाजप आशेवर असेल, तर त्यांनी वाटच बघावी; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

कॉंग्रेस सोबत घेत नाही म्हणून भाजप आशेवर असेल, तर त्यांनी वाटच बघावी; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Ambedkar On Chandrashekhar Bawankule : वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi)भाजपला (BJP)कायम विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)कॉंग्रेस (Congress)घेत नाही, म्हणून आम्ही भाजपकडे जाऊ असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी वाटच बघत बसावी, असा थेट इशाराच वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांना दिला.

Contract Recruitment चा निर्णय ‘हे’ मविआचे पाप…महाभकास आघाडीचा निषेध; म्हणत भाजप आक्रमक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेस्म ऑफ रुपी प्रबंधाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एक प्रवक्ते म्हणून मला आमंत्रण दिलं होतं, त्यानिमित्त मी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे येथे उपस्थित होतो.

नगर तालुक्यातील देहरे गावात दारूचा महापूर, प्रशासनाचा कानाडोळा, गावकऱ्यांकडून आंदोलनचा इशारा

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझा भाजपाला कायम विरोध आहे. कॉंग्रेस मला सोबत घेत नाही म्हणून भाजपा आशेवर असेल, तर त्यांनी वाटच बघावी, असेही ते म्हणाले. त्याचवेळी पत्रकारांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारताच आंबेडकर यांनी सांगितले की, जरांगे पाटलांशी शासनाने इमानदारीने बोलावं.

चार महिने, दोन महिन्याने देत आहे, असे करु नये. शासनाला सांगतो, गावात गेलो तर 20 ते 25 वर्षांच्या तरुणांच्या हाताला काम नाही. त्यांची लग्न झाली नाही, किंवा होत नाहीत. हा लॅन्डेड क्लास आहे, त्यामुळे या वर्गाच्या कौटुंबिक समस्याही निर्माण झाल्या आहेत.

आरक्षण आणि जात गणनेचा संबंध नाही. बिहारमधील जातगणनेतून एकच बाहेर आलं, ते म्हणजे कोणतीही जात प्रबळ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एवढी वर्ष प्लॅनिंग होऊनही आर्थिक दृष्टिकोनातून बदल झाला नाही. राज्यातील जनगणना झाली तर इकॉनॉमिकल असमतोल वाढल्याचे दिसून येईल, त्यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे. जरांगे पाटील यांच्या नावाने वादळ उभं राहिलं आहे, त्यावर प्रामाणिक राहावं, असा इशाराही यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज