मोदींना टाटा,बाय-बाय करा, ओबीसींचा घात भाजप अन् आरएसएसनेच केला; आंबेडकरांचा सल्ला

Prakash Ambedkar यांनी मोदी आणि संघावर टीका करत त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला ओबीसी समाजाला दिला आहे.

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar advice to OBC for Modi, BJP and RSS ambush OBC Reservation : राज्यामध्ये सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा जीआर जारी केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसीमधून आरक्षण मिळाल्याने ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आवाज उठवत राज्याभरात उपोषणं आणि आंदोलन केली जात आहेत. त्यादरम्यान आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी आणि संघावर टीका करत त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला ओबीसी समाजाला दिला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेने धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी आणि संघावर टीका करत त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला ओबीसी समाजाला दिला आहे.ते म्हणाले की, मोदींना टाटा,बाय-बाय करा आणि देश वाचला. कारण ओबीसींचा घात मोदी आणि आरएसएसनेच केला आहे.

राज्यावर पुन्हा घोंगावतयं संकट! मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

ओबीसी समाजाने एवढं तरी डोक्यात घ्यावं तरच ओबीसींना स्थानिक स्वराज्या संस्थांमध्ये नेतृत्व मिळावं म्हणून दिलं गेलेलं राजकीय आरक्षण हातातून जाण्याची शक्यता आहे. तसेच नुसते राजकीय नाही तर शैक्षणिक आरक्षण देखील जाऊ शकते. त्यामुळे ओबीसींनी वेळीच सावध व्हावं. असा सल्ला देश प्रकाश आंबेडकर यांनी मोदी, भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे.

 

follow us