Udhav Thackery : …तर बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्या सारखं; ललित पाटील प्रकरणी ठाकरेंचा निशाणा
Udhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhav Thackery) यांनी ललित पाटील प्रकरणावरून फडणवीसांनी केलेल्या टीकेवर सडेतोड उत्तर दिले आहे. सध्या राज्यात कंत्राटी भरती आणि ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यामध्ये फडणवीसांनी टीका केल्यानंतर आता याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता. त्यांनी यावेळी स्पष्ट उत्तर देणे टाळले आहे. तसेच ललित पाटील प्रकरणावरून फडणवीसांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले की,’बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्या सारखं आहे.’
नगर तालुक्यातील देहरे गावात दारूचा महापूर, प्रशासनाचा कानाडोळा, गावकऱ्यांकडून आंदोलनचा इशारा
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ठाकरे गटाचे कल्यान लोकसभाचे संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांच्या नेतृत्वाखाली रोहिदास मुंडे भाजप दिवा शहर प्रमुख आणि 200 ते 300 कार्यकर्ते कार्यकर्ते आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना कंत्राटी भरती आणि ललित पाटील प्रकरणी फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर विचारण्यात आले.
Mahua Moitra यांचं लोकसभा सदस्यत्व धोक्यात? जाणून घ्या आतापर्यंतचा घटनाक्रम
ठाकरे म्हणाले की, मला जे काही बोलायचे ते मी दसरा मेळावा ला बोलेलतसेच ललित पाटील प्रकरणी आमचे नेते बोलले आहेत. संजय राऊत अरविंद सावंत सुषमा अंधारे यावर बोलले आहेत मी काय वेगळं बोलूललित पाटील जर त्यावेळी शिवसेनेचे नाशिक शहर अध्यक्ष असतील असं त्यांचं म्हणणं आहे तर बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्या सारखं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच कंत्राटी भरती करण्याचं पाप हे मविआचं आहे ते आम्ही आमच्या माथी घेणार नाही असे स्पष्ट सांगून टाकले.
कंत्राटी भरतीच्या संदर्भात पहिला निर्णय 2003 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात झाला आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 साली पहिला जीआर काढला त्यानंतर आणखी एक जीआर 6 हजार पदांच्या भरतीचा काढण्यात आला. यामध्ये शिक्षक भरतीचा जीआर काढण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मविआचं पाप आम्ही आमच्या माथी घेणार नाही. मागील सरकारने युवकांची माफी मागावी. युवकांची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाकरे आणि पवारांनी युवकांची माफी मागावी.