Mahua Moitra यांचं लोकसभा सदस्यत्व धोक्यात? जाणून घ्या आतापर्यंतचा घटनाक्रम

Mahua Moitra यांचं लोकसभा सदस्यत्व धोक्यात? जाणून घ्या आतापर्यंतचा घटनाक्रम

Mahua Moitra : तडाखेबाज भाषणांसाठी प्रसिध्द असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी इतर व्यावसायिकांकडून पैसे घेतले आहेत, असा आरोप जप खासदार निशिकांत दुबे यांनी उपस्थित केला होता.

>Udhav Thackery : …तर बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्या सारखं; ललित पाटील प्रकरणी ठाकरेंचा निशाणा

त्यानतंर आता मोइत्रा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तर या प्रकरणात दर्शन हिरानंदानी यांनी मोईत्रा यांना रोख रक्कम दिल्याचा आरोप आहे. मात्र यामुळे आता मोईत्रा यांचं लोकसभा सदस्यत्त्व धोक्यात आलं आहे. कारण या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभेची आचार समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झालं जाणून घेऊ…

नगर तालुक्यातील देहरे गावात दारूचा महापूर, प्रशासनाचा कानाडोळा, गावकऱ्यांकडून आंदोलनचा इशारा

या प्रकरणावर 26 ऑक्टोबरला लोकसभेच्या आचार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत भाजप खासदार निशिकांत दुबे यांना देखील मोईत्रा यांच्या विरोधातील पुरावे घेऊन येण्यास सांगितले आहे. तसेच खासदार मोईत्रा यांची देखील चौकशी केली जाईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. दुसरीकडे दिल्ला हायकोर्टाने मात्र माईत्रा यांना झटका दिला आहे. त्यामुळे आता मोईत्रा यांचं लोकसभा सदस्यत्त्व रद्द होणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Jitendra Awhad : करारा जवाब मिलेगा..! ‘त्या’ वक्तव्यावर आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा

मोईत्रा यांनी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. तर दुबे यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणावर तृणमुल कॉंग्रेसने केवळ एवढंच म्हटलं आहे की, या प्रकरणावर बोलण्यासाठी पक्षाकडे काहीही नाही. अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी दिली आहे.

तर हीरानंदानी यांनी मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत की, त्यांनी वारंवार त्यांना भेटवस्तू मागितल्या आहेत. त्यामुळे हिरानंदानी यांनी त्यांना महागड्या वस्तू दिल्या आहेत. तसेच त्यांनी त्यांचं संसद लॉगिन क्रिडेंशिअल देखील दिले होते. कारण मोदींना अदानींवर प्रश्न विचारून त्यांना चर्चेत यायचं होतं. असं हीरानंदानी म्हटले आहेत.

दरम्यान सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मोईत्रा यांचे वकील गोपाल शंकरनारायण यांनी या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे. मात्र त्यांच्यावर देखील या प्रकणात आरोप करण्यात आले आहेत ते म्हणजे त्यांनी मोईत्रा यांच्यावतीने फोनवरून संवाद साधत या प्रकरणात मध्यस्थी केली आहे. त्यामुळे 26 ऑक्टोबरला या प्रकरणात काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज