Jitendra Awhad : करारा जवाब मिलेगा..! ‘त्या’ वक्तव्यावर आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा

Jitendra Awhad : करारा जवाब मिलेगा..! ‘त्या’ वक्तव्यावर आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा

Jitendra Awhad : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे म्हणत त्यांनी हे निर्णय रद्द केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही आक्रमक भुमिका घेत शरद पवार (Sharad Pawar) आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली होती.

यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. काल सत्ताधारी पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, त्यांना लाज वाटली पाहिजे, खोटी माहिती पसरवतात, अशा पद्धतीचं विधान केलं. ज्या शासन निर्णयाचा ते उल्लेख करत होते तेव्हा ते स्वतः मंत्रिमंडळात होते आणि त्यांच्या सहकारी गटाचे ते नाव घेतात ते देखील मंत्रिमंडळात होते. त्या जाहिरातीमध्ये क आणि ड गटांचा समावेश होता आणि त्या शासन निर्णयाची कधी अंमलबजावणीच झाली नाही.

जरांगेंनी फोडला भुजबळांचा हुकमी एक्का; गोळाबेरीज करताना होणार दमछाक

आपण जी पदे काढण्याचा प्रयत्न केलात ती तहसीलदार व नायब तहसीलदार ही पदे होती. ती अत्यंत जबाबदारीची आणि राज्याच्या महसुली खात्याशी संबंधित होती. सातबारा, फेरफार अशी शेतकऱ्यांची कामे तसेच शहरातील मोठ्या उद्योग व्यावसायिकांची कामे यांच्याशी संबंध येतो. त्याचबरोबर त्यांच्याकडे काही न्यायालयीन अधिकार देखील असतात. ही पदे एमपीएससी मार्फत भरली जातात. ती पदे आपण कंत्राटी पद्धतीवर देणार होतात, असे आव्हाड यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पहिल्या शासन निर्णयात आपणही मंत्री म्हणून समाविष्ट होतात आणि दुसऱ्या शासन निर्णयात देखील मंत्री म्हणून आपण समाविष्ट होतात. एमपीएससीची पदे कमी करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची टिंगल करणे, त्यांना कंत्राटी पद्धतीवर घेणे आणि त्यांचे आयुष्य उद्धवस्त करणे हा गैरसमज नाही तर आपल्या चुका लोकांसमोर नेल्या होत्या एवढं वाईट वाटून घेऊ नका. लोकं शहाणी झाली आहेत. भलेही आपण स्वतःला हुशार समजत असलो तरी लोकांनाही खूप काही कळत असतं, असा टोला आव्हाड यांनी बावनकुळेंना लगावला.

रोहित पवार लोकसभा लढणार…तर जास्त तयारी करावी लागेल, विखेंचा मिश्किल टोला

तुम्ही काढलेल्या त्या जीआरला महाराष्ट्रातील तरुणाईने प्रचंड विरोध केल्यामुळे कुठल्याही एका पक्षाचे हे यश नाही तर राज्यातील तरुणांचे हे यश आहे. या तरुणांनी उभं राहण्याचं जे धाडस दाखवलं आणि कुठल्या प्रकारे आपण त्यांचं आयुष्य उद्धवस्त करणार आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. शरद पवार साहेब व उद्धव ठाकरे ह्यांना लाज वाटली नाही का? असं म्हणणारा हा मंत्री उद्धव ठाकरेंबरोबर मंत्री होता आणि बाकीचे आठ जण हे सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात होते. पवार साहेबांची व उद्धव साहेबांची लाज काढण्याइतके आपण मोठे झालात ? करारा जवाब मिलेगा.. असा इशाराही आव्हाड यांनी या ट्विटमध्ये दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube