रोहित पवार लोकसभा लढणार…तर जास्त तयारी करावी लागेल, विखेंचा मिश्किल टोला

रोहित पवार लोकसभा लढणार…तर जास्त तयारी करावी लागेल, विखेंचा मिश्किल टोला

Sujay Vikhe On Rohit Pawar : आगामी लोकसभेच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असून पक्षांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाची (NCP Sharad Pawar group) मुंबईत (Mumbai)बैठक पार पडली. या बैठकीत नगर दक्षिण लोकसभेसाठी रोहित पवार (Rohit Pawar)यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, मी त्याला विचारून घेईल मी चर्चा करून विश्वास ठेवणारा माणूस आहे. जर तो हो म्हणाला तर जास्त तयारी करावी लागेल पण आम्ही चर्चा करून ठरवू, असा मिश्किल टोला यावेळी सुजय विखे यांनी लगावला आहे.

Sanjay Raut : 2024 आधी काय होणार? राऊतांना मोठ्या षडयंत्राचा संशय

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाबाबत आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीला पक्षाचे अनेक नेते मंडळी देखील उपस्थित होते. या बैठकीत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना खासदारकीच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार असल्याची चर्चा झाली. दरम्यान नगर दक्षिण लोकसभा राज्यात चर्चेत आहे. यातच नुकतेच विखे यांनी देखील लोकसभेच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहे.

शिरूरच्या लोकसभेवरून महायुतीत मिठाचा खडा?; वळसे पाटलांनी दावा ठोकल्याने संघर्ष वाढणार

दरम्यान मोहटादेवी गडावर दर्शनासाठी खासदार सुजय विखे हे गेले होते. यावेळी त्यांना रोहित पवार यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे यावर प्रश्न करण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना खासदार सुजय विखे पाटील यांनी एका मिश्किल टोला लगावला.

सुजय विखे म्हणाले, मी त्याला विचारून घेईल मी चर्चा करून विश्वास ठेवणारा माणूस आहे. त्याला आधी विचारतो काय त्याच्या मनात आहे आणि त्या अनुषंगाने मग मी तयारीला लागतो. तसेच जर तो हो म्हणाला तर जास्त तयारी करावी लागेल पण आम्ही चर्चा करून ठरवू असे देखील यावेळी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, सध्या राज्याची परिस्थिती कशी आहे हे सर्वजण पहात आहात मित्र वैरी वैरी मित्र असे सर्व एक समान झालेले आहेत, त्यामुळे सर्वजण आपापल्या मित्राच्या शोधात आहेत नवीन मित्र शोधतात अशा मित्रांच्या सानिध्यात राहून नवीन राजकारण करता येत असेल तर करूयात असं त्यांनी सांगितल आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube