Sanjay Raut : 2024 आधी काय होणार? राऊतांना मोठ्या षडयंत्राचा संशय
Sanjay Raut : ‘देशातील विरोधकांना गनपॉइंटवर संपवण्याचं षडयंत्र सध्या सुरू आहे. जो बोलेल, आवाज उठविण्याचा प्रयत्न करील मग तो संजय राऊत (Sanjay Raut), राहुल गांधी, महुआ मोईत्रा किंवा संजय सिंह असो एकतर त्यांना जेलमध्ये टाका किंवा निलंबित करा. संसद सदनातून बाहेर काढा हे षडयंत्र देशात सुरू आहे. खासदार मोईत्रा यांनी जे प्रश्न विचारले त्यामुळे सरकार गडबडल्याचं मी पाहिलं. राहुल गांधींनी वारंवार जे प्रश्न विचारले त्यावर सरकारकडे काहीच उत्तर नाही. संजय राऊतांनी प्रश्न विचारले त्यांना जेलमध्ये टाकलं. संजय सिंह यांनी प्रश्न विचारले त्यांनाही जेलमध्य टाकलं. आता 2024 च्या आधी आणखीही काही लोकं जेलमध्ये जातील त्यासाठी आमची मानसिक तयारी आहे’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.
‘तुमच्या पक्षाचा दाऊद अध्यक्ष अन् छोटा शकील सेक्रेटरी’; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात !
खासदार राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात राज्य सरकार आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच केंद्रातील मोदी सरकारवरही टीका केली. यानंतर पत्रकारांनी त्यांना मध्यप्रदेशातील जागावाटपावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यातील वादावर प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) विरोधकांनी इंडिया आघाडी (INDIA Alliance) तयार केली आहे. पण राज्यपातळीवर जे काही प्रश्न उपस्थित होतात त्यावर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. यासंदर्भात अखिलेश यादव यांच्याशी आम्ही चर्चा करू.
तुम्ही कसले गृहमंत्री ?
फडणवीसांना उद्देशून राऊत म्हणाले, तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात तेव्हा माहिती घेऊन बोला. तपास करा. ड्रग्ज माफियांकडून भाजपाला हप्ता मिळतोय. आम्ही काल मोठा मोर्चा काढला. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोक रस्त्यावर उतरले होते. कारण, ड्रग्ज त्यांच्या घरात शिरलंय. ड्रग्जमुळे नाशिकसारखं शहर खराब झालं. गुजरात राज्यातून नाशिक शहरात ड्रग्ज येत आहे. त्यावर आधी बोला. तुम्ही कसले मंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहात, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.
Lok Sabha Election : शरद पवारांच्या मतदारसंघात नवा ट्विस्ट! राजकीय शिष्यालाच भाजप देणार तिकीट?
दाऊद भाजपाचा अध्यक्ष अन् छोटा शकील सेक्रेटरी
राऊत म्हणाले, ज्या व्यक्तींनी ललित पाटीलचे पालनपोषण केल आणि त्याला मातोश्रीवर आणले ते नाशिकचे दादा भुसे, अजय बोरस्ते आहेत. त्यावेळी अजय बोरस्ते नाशिकचे शहरप्रमुख होते. हे दोघेही आता सत्ताधारी पक्षात आहेत. राज्याचे गृहमंत्री 2020 मध्ये ललित पाटील नाशिकचा महानगरप्रमुख होता असा दावा करत असतील तर 1991-92 मध्ये मुंबईत दंगली झाल्या तेव्हा दाऊद इब्राहिम तुमच्या पक्षाचा अध्यक्ष होता आणि छोटा शकील भाजपाचा जनरल सेक्रेटरी होता अशा शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.