Lok Sabha Election : शरद पवारांच्या मतदारसंघात नवा ट्विस्ट! राजकीय शिष्यालाच भाजप देणार तिकीट?
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे (Lok Sabha Election) जोरात वाहत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीमुळे सगळीच गणिते बदलली आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) स्वतः मैदानात उतरले आहेत. ते यंदा निवडणूक लढतील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही मात्र समर्थक कार्यकर्त्यांकडून त्यांना पु्न्हा निवडणूक लढण्यासाठी गळ घातली आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली होती. त्यात माढामधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. शरद पवार यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतला नसला तरी येथील निवडणुकीत मोठा ट्विस्ट मात्र आला आहे.
ठाकरे, पवार अन् पटोलेंना सकाळपर्यंत वेळ; ‘नाक घासून’ राज्याची माफी मागावी! बावनकुळे आक्रमक
भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतः माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे, असे मोहिते पाटील यांनी काल पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. काल पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर मोहिते पाटील यांनी 2024 साठी आपण तयार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.
देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रातून जे ठरेल त्यापद्धतीने होईल. माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माझ्यावर टाकलेली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिला तर निवडणूक नक्कीच लढणार असल्याचे मोहित पाटील म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलन तापणार? शिंदे समितीकडून ‘दोन’ महिन्यांच्या वाढीव मुदतीची मागणी
भाजपात वादाच्या ठिणग्या
दरम्यान, या मतदारसंघात अद्याप भाजपाचा उमेदवार ठरलेला नाही. तरीदेखील आतापासूनच पक्षाला येथे अंतर्गत वादाला तोंड द्यावे लागत आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या समर्थकांत जोरदार वाक् युद्ध सुरू झाले आहे. सोशल मीडियात तर एकमेकांविरोधातील पोस्टचा पूर आला आहे. अशा परिस्थितीत तिकीट कुणाला द्यायचं हा मोठा प्रश्न भाजप पक्षश्रेष्ठींसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे तिकीट वाटपात भाजप नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार हे मात्र नक्की.