कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
पोलिसांनी पलटी झालेली क्रेटा बाजूला करता वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. यावेळी बघ्यांचा मोठा जमाव जमला होता.
कोल्हापुरच्या शाहू मिल चौकामध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात क्रेटा कारने दुचाकीला उडवल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये क्रेटाने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार दूर उडून पडल्याने अत्यंत गंभीर जखमी झाले. त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, क्रेटा कारने धडक दिल्यानंतर क्रेटाकार ही रस्त्याच्या मधोमध उलटी झाली होती. तर धडक दिलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला होता. रस्त्याच्या कडेला पडजागेत दुचाकीस्वार जाऊन कोसळले. त्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करत जखमींना सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी तत्काळ पोलीस दाखल झाले. पोलिसांनी पलटी झालेली क्रेटा बाजूला करता वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. यावेळी बघ्यांचा मोठा जमाव जमला होता.
