राहुल गांधींना गोकुळचा विषयच समजला नाही; ‘जिथे तिथे मतचोरीच दिसते’, हसन मुश्रीफांचा पलटवार
Hasan Mushrif on Gokul Milk Union; हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघातील 5 शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावरून राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं.
Hasan Mushrif on Gokul Milk Union Rahul Gandhi: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील शासननियुक्त संचालकांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर बहुमताची चोरी केल्याचा आरोप केल्यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राहुल गांधींना मुळात गोकुळचा विषयच समजलेला नाही. त्यांना जिथे तिथे मतचोरीच दिसते,’ अशा शब्दांत मुश्रीफ यांनी राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं.
इथंही मतांची चोरी? गोकुळमध्ये 4 संचालक नेमण्याच्या निर्णयावरून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
बैठकीला गैरहजर राहिल्याने प्रशासक नेमण्याची वेळ आली
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या गटाला 13, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांच्या गटाकडे एका जागेचं बहुमत आहे. मात्र, गोकुळच्या उपनियमांनुसार संचालक मंडळाच्या बैठकीसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक आहे. अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेल्या बैठकीला 12 सदस्य गैरहजर राहिल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रखडली आणि प्रशासक नेमण्याची वेळ आली, असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
गोकुळचा कारभार निवडून आलेल्यांच्या हातातच राहावा
या परिस्थितीमुळे गोकुळमध्ये एक प्रकारचा पेच निर्माण झाला होता. हा पेच सोडवण्याची जबाबदारी सरकारची होती. साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि संस्थेचा कारभार निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या हातात राहावा, यासाठी सरकारने 5 शासननियुक्त तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. या निर्णयाला त्यांनी पाठिंबाही दर्शवला.
गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’; रोहित पवारांचा हल्लाबोल
माझा मुलगाही संचालक होणार नाही
शासननियुक्त संचालकांच्या निवडीवरून सुरू असलेल्या चर्चेवरही मुश्रीफ यांनी भाष्य केलं. या पदांवर राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींची नियुक्ती होणार नाही, माझा मुलगा असो किंवा अन्य कोणी, तो तज्ज्ञ संचालक होणार नाही. संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेल्या आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या तज्ज्ञांचीच नियुक्ती सरकार करेल, अशी अपेक्षा असल्याचं मुश्रीफ म्हणाले.
विरोधकांनी बैठकीला येऊन त्यांचाच अध्यक्ष करावा का?
गोकुळमधील पेच समजून घेताना विरोधकांच्या भूमिकेवरही मुश्रीफ यांनी प्रश्न उपस्थित केला. आम्ही 12 सदस्य विरोधी पक्षात आहोत. मग आम्ही बैठकीला जाऊन सत्ताधारी गटाचा अध्यक्ष निवडून आणावा, असा जनादेश आम्हाला मतदारांनी दिलेला नाही. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी दिली आहे, असं ते म्हणाले.
NCP MLA : दिवाळीनंतर राज्यात राजकीय भूकंप? राष्ट्रवादीचे सर्व आमदार CM फडणवीसांना भेटणार
तसंच, निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडीच्या बैठका वारंवार तहकूब झाल्यास प्रशासक नेमण्याची वेळ येऊ शकते. गोकुळमध्ये निर्माण झालेला पेच दूर करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करणं आवश्यक होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.