ठाकरे, पवार अन् पटोलेंना सकाळपर्यंत वेळ; ‘नाक घासून’ राज्याची माफी मागावी! बावनकुळे आक्रमक

ठाकरे, पवार अन् पटोलेंना सकाळपर्यंत वेळ; ‘नाक घासून’ राज्याची माफी मागावी! बावनकुळे आक्रमक

मुंबई : कंत्राटी भरतीच्या निर्णयावरूनरान उठत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. फडणवीस यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली. ते नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Mahavikas Aghadi over the decision of contract recruitment)

ठाकरे नाक घासून माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन

कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे अभिनंदन करतो. या कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणाऱ्या उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले आणि मविआने आता महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी. उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला आहे, असे बावनकुळे म्हणाले.

“पुण्यावर तर आहेच पण कोल्हापूरवरही माझे लक्ष” : चंद्रकांतदादांचा अजितदादा अन् मुश्रीफांना इशारा

बावनकुळे म्हणाले, मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयावर सही केली. आता तेच कंत्राटी पद्धती देवेंद्र फडणवीस यांनी आणली असे म्हणून दोष देत नौटंकी करत आहेत. त्यांच्यासारखा खोटारडा माणूस मी पाहिला नाही. सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि मविआचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केली. त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे काँग्रेसने केलेले पाप आहे.

मराठा आरक्षण आंदोलन तापणार? शिंदे समितीकडून ‘दोन’ महिन्यांच्या वाढीव मुदतीची मागणी

उद्धव ठाकरेंसह मविआचे नेते केवळ बोलघेवडे आहेत. महाराष्ट्राच्या जनतेची केलेली फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीररीत्या उघड केली. त्यामुळे त्यांनी उद्या सकाळी 9.30 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अन्यथा भाजपाचे राज्यभरातील लाखो कार्यकर्ते सकाळी 10 वाजता रस्त्यावर उतरतील व आंदोलन करतील. महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या नेत्यांना भाजपा धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असाही इशारा बावनकुळे यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube