“पुण्यावर तर आहेच पण कोल्हापूरवरही माझे लक्ष” : चंद्रकांतदादांचा अजितदादा अन् मुश्रीफांना इशारा

“पुण्यावर तर आहेच पण कोल्हापूरवरही माझे लक्ष” : चंद्रकांतदादांचा अजितदादा अन् मुश्रीफांना इशारा

पुणे : “मी पुण्याचा आमदार आहे. चार वर्षांपासून मी पुण्यातील सगळ्या संघटनात्मक आणि शासकीय कामात सहभागी आहे. त्यामुळे माझे पुण्यावर लक्ष आहेच. पण माझे कोल्हापूरवरही लक्ष आहे. दर आठवड्याला मी एक दिवस कोल्हापूरला जातो. त्यामुळे कोणालाही, अभी मेरा कुछ काम नही, असं म्हणून सोडता येत नाही. ते काही योग्य नाही. ते काम टाळणाऱ्या माणसाचे लक्षण असते. त्यामुळे कोल्हापूरमध्येही तेवढाच सक्रिय असतो, असं सांगतं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकप्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला. ते अमरावतीमध्ये आढावा बैठकीनंतर बोलत होते. (Chandrakant Patil clear that I am active in both the cities of Pune and Kolhapur)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, अजितदादांना पुन्हा पुण्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. पण त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्याने भाजपच्या गोटात निराशेचे वातावरण आहे. शिवाय यामुळे आधीच कोल्हापूरपासून दुरावलेले चंद्रकांत पाटील आता पुण्यापासूनही दुरावले जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

अजितदादांसोबतची बैठक का टाळली? चंद्रकांतदादांनी सांगितलं पुण्यात अनुपस्थित राहण्याचं कारण

चंद्रकांतदादा पुण्याचे कारभारी :

मुळचे कोल्हापूरचे असलेल्या चंद्रकांत दादांना 2019 मध्ये विधानपरिषदेवरुन विधानसभेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांना भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून तिकीट दिले आणि तिथून ते निवडूनही आले. त्यानंतर महायुती सरकार काळात त्यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपदही देण्यात आले. त्यामुळे पुण्याच्या संघटना आणि शासकीय कामांवर चंद्रकांत पाटील यांचा होल्ड निर्माण झाला होता. अशात महापालिका आणि जिल्हा परिषदेची मुदत संपल्याने एकप्रकारे पालकमंत्री या नात्याने ते पुण्याचे कारभारीच झाले होते.

Ajit Pawar : नावाजलेल्या वकीलांसह मार्ग काढणार, आरक्षणाचं अश्वासन देत अजितदादांची सावध भूमिका

चंद्रकांतदादा दिवसेंदिवस कोल्हापूरपासूनच लांबच :

पण या दरम्यान, कोल्हापूरमधून निवडणूक न लढविल्याने त्यांच्यावर अनेकदा टीका झाली. ते कोल्हापूरपासून स्वतःला लांब ठेवतात, कोल्हापूरमधून पराभावाची भीती होती म्हणून त्यांनी पुण्याची निवड केली, असे म्हणत त्यांना ट्रोल करण्यात आले. यावर एकदा बोलताना चंद्रकांत पाटलांनी “कोल्हापूरमधून कोणत्याही मतदारसंघातून एकाने राजीनामा द्यावा आणि तिथे पोटनिवडणूक लावावी”, असे आव्हान दिले होते. त्यानंतर दोन वर्षांत कोल्हापूर उत्तरमध्ये चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हा तिथून चंद्रकांत पाटील निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यावेळी भाजपने सत्यजित कदम यांना तिकीट दिले.

त्यानंतरही पाटील यांच्यावर टीका झाली. आता पुन्हा त्यांना कोल्हापूरमध्ये पाठविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु होते. मात्रकोल्हापूरचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांच्याकडे गेले. पण असे असले तरीही आपले पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांकडे लक्ष असल्याचे सांगत त्यांना अप्रत्यक्षपणे आपल्याकडे आता सोलापूर आणि थेट विदर्भातील अमरावती जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरीही आपण पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांमधील होल्ड सोडलेला नाही असं सांगितलं असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube