Ajit Pawar : नावाजलेल्या वकीलांसह मार्ग काढणार, आरक्षणाचं अश्वासन देत अजितदादांची सावध भूमिका
Ajit Pawar : पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पावर (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यामध्ये कालवा समिती बैठक झाली. त्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी सावध भुमिका घेत आरक्षण देण्याचं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आज पुण्यामध्ये कालवा समिती बैठक झाली. यावेळी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या सभेबद्दल विचारलं असता त्यांनी प्रतिक्रीया दिली की, त्याना सभा घेण्याचा अधिकार आहे त्यामुळे कोणाला वाटेल तिथं जो तो सभा घेऊ शकतो,आम्ही याबाबत सर्वपक्षीय बैठक घेतली आहे,आज समाजातील इतर आरक्षणाला धक्का न लागता ही मराठा समाजाची मागणी मान्य कराव्या, नावाजलेल्या वकील यांना घेऊन मार्ग काढावा अशी आमची भूमिका आहे.
Rajkummar Rao: राजकुमार रावला ‘गन्स अँड रोझेस’ मधील दमदार अभिनयासाठी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड
दरम्यान गेल्या महिन्याभरापासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह मराठा समाज मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आक्रमक झाला आहे. मात्र, अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळं आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. अंतरवली सराटी गावात सभा घेतल्यानंतर त्यांची आज राजगुरूनगऱमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
Chitra Wagh : ‘2024 नंतर ‘त्यांची’ कुत्ता गोळीची नशा उतरेल’; चित्रा वाघांचा ठाकरेंवर हल्लाबोल
आज पुण्यामध्ये कालवा समिती बैठक झाली. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. धरणातील पाणी पिण्यासाठी शिल्लक ठेवायचा साठा. वीर धरणात पाणी कमी तिकडे काटकसर करावं लागेल. असं ही यावेळी सांगण्यात आलं. त्याचबरोबर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये देखील पाण्याचे काटकसरीने वापर करणे गरजेचे असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले.
दरम्यान यावेळी असं ही सांगण्यात आलं की, दोन चक्री वादळ निर्माण झाले आहेत. त्यामुळे पाऊस पडू शकतो, अस हवामान खात्याने शक्यता वर्तवले आहे. त्यातून पाऊस झाला पाण्याची पातळी वाढली तर परिस्थिती आणि नियोजन बदलू शकते. असं ही यामध्ये सांगण्यात आलं. सोलापूर, नगर, बीड, आशा चार पाच जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. तर सात दिवसांनी परत ही बैठक होणार आहे.