Chitra Wagh : ‘2024 नंतर ‘त्यांची’ कुत्ता गोळीची नशा उतरेल’; चित्रा वाघांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Chitra Wagh : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार आणि ठाकरे गटात जोरदार वाक् युद्ध सुरू आहे. ठाकरे गटाकडून सरकारवर विखारी टीका केली जात असताना भाजपाच्या नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसेच सामना वृत्तपत्रातून केल्या जात असलेल्या टीकेवर आज भाजप महिला आघाडीच्या प्रमुखे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार पलटवार केला आहे.
वाघ यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटावर घणाघाती टीका केली आहे. दररोज सकाळी पिसाळल्यागत भुंकणाऱ्यांना पाहिल्यानंतर जनतेला कळलं असेलच की कुत्ता गोलीची नशा कोण करतंय ते.. सर्वज्ञानी संजय राऊत दररोज सकाळी तोंड उघडल्यानंतर जे काही बरळतात त्यावरून कळतं की त्यांची कुत्ता गोळीची नशा कधी उतरतच नाही. कुत्ता गोलीच्या नशेत असल्यामुळेच सर्वज्ञानी संजय राऊतांच्या तोंडून महिलावाचक शिवीगाळ येते.. बाळासाहेबांच्या विचारांना सोडून औरंगजेबाच्या थडग्यावर मस्तक टेकवणारे कुत्ता गोळीच्या नशेतच असावेत.
दररोज सकाळी पिसाळल्यागत भुंकणा-यांना पाहिल्यानंतर जनतेला कळालंच असेल की कुत्ता गोलीची नशा कोण करतंय ते …
सर्वज्ञानी संजय राऊत @rautsanjay61 दररोज सकाळी तोंड उघडल्यानंतर जे काही बरळतात… त्यावरून कळतं की त्यांची कुत्ता गोळीची नशा कधी उतरतच नाही.
कुत्ता गोलीच्या नशेत…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 20, 2023
हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी कुत्ता गोळी घेतली असावी. कोविड घोटाळ्यातील भ्रष्टाचार, पत्राचाळीतील भ्रष्टाचार हे गुन्हे कुत्ता गोळीची नशा करूनच केले असावेत… उद्धव ठाकरेंच्या आसपास असे कुत्ता गोळी खाणारे नशेबाज असल्यामुळेच त्यांचा पक्ष उद्धवस्त झाला. कुत्ता गोळीची ही नशा डोक्यात इतकी भिनलीय की आता भ्रमिष्ट झालेल्या संजय राऊतांना महायुती सरकार करत असलेला महाराष्ट्राचा विकास दिसेनासा झाला आहे.. 2024 च्या निवडणुकांनंतर यांची ही कुत्ता गोळीची भयानक नशा नक्कीच उतरेल, अशी खोचक टीका वाघ यांनी केली.
सरकारवर कुत्ता गोलीप्रमाणे नशेचा अंमल – ठाकरे गट
महाराष्ट्राच्या संपूर्ण सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल कुत्ता गोलीप्रमाणे चढला आहे. मिळेल त्या मार्गाने पैसा ओढायचा. मग तो नशेच्या व्यापाराचा का असेना. इथपर्यंत सरकारच्या नितीमत्तेची घसरण झाली आहे. ससून इस्पितळात एक ड्रग्ज माफिया मंत्र्यांच्या आशिर्वादाने नऊ महिने पाहुणचार घेतो व एक दिवस पसार होतो. बोभाटा झाल्यावर तो पकडला जातो. पकडलेला ललित पाटील तोंडावरील बुरख्याआडून मला पळविण्यात आले असे सांगतो. मिंधे सरकार व त्यांच्या गृहमंत्र्यांची ही लक्तरे आहेत. गुजरात हे ड्रग्ज माफियांचे आंतरराष्ट्रीय आगार बनले आहे. गुजरातचा माल महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राला नशेबाज करण्याचे कारस्थान उधळून लावावेच लागेल, अशी टीका ठाकरे गटाने आज सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.