ट्रम्प ‘मादुरो’ ला आणू शकतो तर मोदीजी मसूद अझहरला का आणू शकत नाही? ओवैसी भडकले

Asaduddin Owaisi On Venezuela : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोला अटक

Asaduddin Owaisi On Venezuela

Asaduddin Owaisi On Venezuela : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोला अटक केली आहे. यावरुन आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आयोजित एक जाहीर सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाती 56 इंच आहे. जर ट्रम्प निकोलस मादुरोला आणू शकतो तर तुम्ही पाकिस्तानमधील मसूद अझहरला का आणू शकत नाही असं असदुद्दीन औवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना विचारले आहे.

नेमकं काय म्हणाले औवैसी ?

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी (BMC Election) आयोजित एका जाहीर सभेत बोलताना असदुद्दीन औवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोला त्यांच्या देशात जाऊन अटक केली आहे आणि अमेरिकेला घेऊन गेले आहे. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे (Venezuela) राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना त्यांच्या देशात जाऊन अटक करुन अमेरिकेला घेऊन जाऊ शकतात तर पंतप्रधान मोदी देखील पाकिस्तानला जाऊन 26/11 च्या दहशवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड मसूद अझहरला भारतात परत आणू शकतात. तुम्हीही कोणापेक्षा कमी नाही. मोदीजी तुमची 56 इंच छाती दाखवा असं या सभेत बोलताना खासदार असदुद्दीन औवैसी म्हणाले. तर दुसरीकडे या जाहीर सभेत बोलताना खासदार औवैसी यांनी भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांनी एकत्र येत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीची घोषणा केली आहे तर शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याने कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

वीज मोफत अन् दर महिन्याला 1500 रुपये ; मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा आज संयुक्त जाहीरनामा

follow us