चीनपेक्षाही RSS धोकादायक…, असदुद्दीन ओवैसींचा PM मोदींवर हल्लाबोल

Asaduddin Owaisi On PM Modi : स्वातंत्र्यदिनानिमित्त आज लाला किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी तिरंगा फडकावला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही (RSS) उल्लेख केला आणि संघाचे कौतुक करत जगातील सर्वात मोठी एनजीओ म्हणत भारताच्या स्वतंत्र्य इतिहासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग असल्याचा म्हटले. तर आता विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहे. यातच एमआयएमचे (MIM) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी आरएसएसला भारतासाठी चीनपेक्षा देखील धोकादायक म्हणत पंतप्रधान मोदींवर (China) निशाणा साधला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी एक्सवर म्हटले आहे की, स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आरएसएसचे कौतुक करणे हे स्वातंत्र्यलढ्याचा अपमान आहे. स्वातंत्र्याच्या काळात आरएसएस आणि त्यांच्या वैचारिक सहयोगी ब्रिटिशांचे पायदळ सैनिक म्हणून काम करत होते. त्यांनी कधीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही. त्यांनी जितका गांधींचा द्वेष केला तितका ब्रिटिशांचा त्यांनी कधीही विरोध केला नाही. असं खासदार असदद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.
पुढे ओवैसी म्हणाले की, आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी आपल्याला आठवण करुन दिली आहे की, खरा इतिहास वाचणे आणि देशाच्या खऱ्या नायकांचा आदर करणे किती महत्वाचे आहे. जर आपण असं केले नाही तर तो दिवस दुर नाही जेव्हा आपल्याला भ्याडपणा शौर्याच्या रुपात विकला जाईल. असं म्हणत ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
Glorifying the RSS in an Independence Day speech is an insult to the freedom struggle. The RSS and its ideological allies served as British foot soldiers. They never joined the fight for independence and hated Gandhi more than they ever opposed the British.
Happy…
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) August 15, 2025
हिंदुत्वाची विचारसरणी बहिष्कारावर विश्वास ठेवते आणि आपल्या संविधानाच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे. मोदी नागपूरला जाऊन स्वयंसेवक म्हणून आरएसएसचे कौतुक करू शकले असते, पंतप्रधान असताना त्यांना लाल किल्ल्यावरून असे का करावे लागले? चीन आपला सर्वात मोठा बाह्य धोका आहे, परंतु त्याहूनही मोठा धोका आत आहे – संघ परिवार पसरवत असलेला द्वेष आणि विभाजन. आपले स्वातंत्र्य खरोखर सुरक्षित करण्यासाठी आपल्याला अशा सर्व शक्तींना पराभूत करावे लागेल. असं देखील ओवैसी म्हणाले.
जनाची नाही तर मनाची ‘ते’ वक्तव्य पवारांसाठीच…, मंत्री विखेंनी मांडली भूमिका
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आरएसएसचे कौतुक केले आणि म्हटले की, आरएसएसचा गौरवशाली इतिहास आहे. जगातील सर्वात मोठी एनजीओ आहे. यावेळी मोदींनी आरएसएसच्या सर्व स्वयंसेवकांचे राष्ट्रसेवेबद्दल कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला. वैयक्तिक विकासाद्वारे राष्ट्र उभारणीच्या संकल्पाने संघाने 100 वर्षे काम केले.