BMC Election : वीज मोफत अन् दर महिन्याला 1500 रुपये ; मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा आज संयुक्त जाहीरनामा
BMC Election : राज्यात महापालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली असून आता प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करताना
BMC Election : राज्यात महापालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली असून आता प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहे. तर दुसरीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेसाठी आज राज ठाकेर आणि उद्धव ठाकरे संयुक्त जाहीरनामा जाहीर करणार आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या संयुक्तपणे या जाहिरनाम्याचे प्रेझेंटशन शिवसेना ठाकरे आणि मनसे युतीच्या उमेदवारांसमोर केलं होतं. तर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईकरांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात जाणार आहेत. या जाहीरनाम्यात वीजबिल, बेस्ट बस दर, पाळणाघर, शासकीय महाविद्यालयाबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी (BMC Election) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे सहा प्रचारसभा देखील घेणार आहेत.
कसा असेल जाहिरनामा
शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे युतीच्या जाहिरनाम्यात 12 मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ , 100 युनिटपर्यंत वीज मोफत, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये दर महिन्याला, कोळी महिलांना माँसाहेब किचनमधून 10 रुपयांत जेवण, तरुणांना रोजगार सहायता निधीतून मदत, बेस्टचं तिकीट कमी करुन 5 ते 10 रुपये, 15 ते 20 रुपये यादरम्यान स्थिर ठेवणार, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर, पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मोठं ग्रंथालय सुरु करणार, प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्टस कॉम्प्लेक्स, मोफत पार्किंगची सोय, बीपीटीच्या 1800 जागेवर गिफ्ट सिटीसारखं काम या सारख्या घोषणा या जाहिरनाम्यात करण्यात आल्या आहे.
जमीन खरेदीची शक्यता अन् होणार आर्थिक फायदा; 4 जानेवारी ‘या’ राशींसाठी कसा राहील ?
मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य लढत शिवसेना ठाकरे – मनसे युती आणि भाजप- शिवसेना शिंदे गट युतीमध्ये होणार असल्याने कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
