अभिमानास्पद! मराठी चित्रपट दशावतार’ची ऑस्कर झेप; दिग्दर्शकांची महत्वाची पोस्ट

हजारो चित्रपटातून जे १५०+ चित्रपट निवडले गेलेत त्यातला हा एकमेव मराठी चित्रपट आहे. Academy Screening Room मध्ये दाखवला जाणारा आहे.

News Photo   2026 01 03T194326.242

कोकणाची परंपरा दाखवत महत्त्वाच्या विषयावर (Film) भाष्य करणारा ‘दशावतार’ प्रेक्षकांना भावला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. आता ‘दशावतार’ ऑस्कर गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी ही आनंदाची बाब आहे. सिने इंडस्ट्रीसाठी सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत ‘दशावतार‘ सिनेमाचीही निवड झाली आहे. ‘दशावतार’ सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावरुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

सुबोध खानोलकर यांनी एक मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. नमस्कार सुजय, ‘दशावतार’ आता ऑस्कर स्क्रिनिंग रुममध्ये लाइव्ह दिसेल. धन्यवाद” असं या मेसेजमध्ये लिहिलं आहे. हा मेसेज शेअर करत सुबोध खानोलकर यांनी पोस्ट लिहिली आहे. कष्टांचं, प्रामाणिकपणाचं, मोठं स्वप्नं पाहण्याचं चीज होतंच. फक्त कामावर विश्वास हवा, खाली मान घालून कष्ट करत राहण्याची चिकाटी हवी, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द हवी आणि विश्वास ठेवणाऱ्या माणसांची खंबीर साथ हवी, अशा भावना त्यांनी पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.

आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा; पन्नासहून अधिक देशांतील व भाषांतील सिनेमांचा समावेश

आज ‘दशावतार’ ऑस्करच्या म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत निवडला गेल्याचा मेल आला आणि गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याची दखल घेतली गेल्याचं समाधान मिळालं. हे समाधान फक्त ‘दशावतार’ निवडला गेलाय म्हणून नाहीये, तर आपला मराठी चित्रपट जागतिक स्तरावर तोडीस तोड उभा राहू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय म्हणून आहे. मुख्य स्पर्धेच्या कॅटेगिरीत निवडला गेलेला ‘दशावतार’ हा बहुदा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

हजारो चित्रपटातून जे १५०+ चित्रपट निवडले गेलेत त्यातला हा एकमेव मराठी चित्रपट आहे. आणि Academy Screening Room मध्ये दाखवला जाणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे, असंही त्यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे. दरम्यान, ‘दशावतार’ या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला होता. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, आरती वडगबाळकर या कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

follow us