Rajkummar Rao: राजकुमार रावला ‘गन्स अँड रोझेस’ मधील दमदार अभिनयासाठी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड

Rajkummar Rao: राजकुमार रावला ‘गन्स अँड रोझेस’ मधील दमदार अभिनयासाठी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड

Actor Rajkummar Rao: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि त्याने साकारलेल्या पात्रांना पूर्णपणे न्याय देऊन नेहमीच या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. ‘गन्स अँड गुलाब्स’मध्ये (Guns and Roses) त्याच्या हटके कॉमेडी थ्रिलरमध्ये राजकुमार राव ला अभिनयासाठी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड (Popular Choice Award) देण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)


‘गन्स अँड गुलाब्स’ या बहुप्रतिक्षित सीरिजचा ट्रेलर लाँच झाला असून एक उत्तम कॉमेडी बघायला मिळणार असल्यची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. राज आणि डीके दिग्दर्शित या आगामी कॉमेडी थ्रिलरसाठी चाहते उत्सुक आहेत. दुलकर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशन सोबत अविश्वसनीय प्रतिभावान राजकुमार राव यांच्या भूमिका यात अनुभवयाला मिळाले आहेत.

नव्वदच्या दशकात सेट केलेली ही थरारक अॅक्शन आणि विनोदाच्या रोलर-कोस्टर राइड असलेली कॉमेडी असणार आहे या सगळ्यात एक विषय चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजकुमार रावचा नवीन लूक ! जाड केस, एक चकचकीत जाकीट, आणि एक विनोदी स्वभाव जो अप्रतिम आहे. समीक्षकांच्या प्रशंसनीय कामगिरीपासून ते बॉक्स ऑफिसच्या यशापर्यंत राजकुमार राव यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका हटके होत्या.

Janhvi Kapoor Dance: ‘हम आये हैं’ गाण्यावर टायगरसोबत जान्हवी थिरकली, Video Viral

‘द फॅमिलीमॅन’ आणि ‘फर्जी’सारखे शो आपल्याला देणारे दिग्दर्शक राज आणि डीके यांनी ह्या सीरिजची निर्मिती केली आहे. राजकुमार रावने पाना टिपूची भूमिका साकारली आणि तो सुपरहिट ठरला. त्याच्या आधीच प्रभावी अभिनयासाठी यादीत भर घालून राजकुमार राव प्रेक्षकांना “स्त्री 2,” आणि “एसआरआय” यासह रोमांचक आगामी सिनेमात दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube