अजितदादांसोबतची बैठक का टाळली? चंद्रकांतदादांनी सांगितलं पुण्यात अनुपस्थित राहण्याचं कारण

अजितदादांसोबतची बैठक का टाळली? चंद्रकांतदादांनी सांगितलं पुण्यात अनुपस्थित राहण्याचं कारण

अमरावती : माझा अमरावती दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे मी पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीला अनुपस्थित होतो. मात्र अजित पवार यांनी तातडीची बैठक घेतली. त्यामागे कारणही महत्वाचं होतं. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे त्यांनी बैठक घेणं बरोबर आहे. मी बैठकीला ऑनलाइन उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण ते तांत्रिक कारणामुळे शक्य झाले नाही. मात्र दुपारच्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित राहिलो, असं स्पष्ट करत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीला अनुपस्थित राहण्यामागील कारण सांगितलं. ते अमरावती येथील आढावा बैठकीनंतर बोलत होते. (Chandrakant Patil explained that I was absent from the canal committee meeting in Pune)

आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कोथरुड मतदारसंघाचे आमदार तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील गैरहजर राहिले. त्यांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा सुरू झाली. चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात न थांबता अमरावती गाठली. परंतु, चंद्रकांतदादा या बैठकीला का हजर राहिले नाहीत?, दोघांतील संघर्ष अजूनही सुरुच आहे का? अशा चर्चा यामुळे सुरू झाल्या होत्या. पालकमंत्री पदावरून गच्छंती झाल्यानंतर दोन्ही दादा आज प्रथमच एकत्र येणार होते. त्यामुळे या संभाव्य भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

Pune News : पुण्यातील दोन्ही ‘दादां’चा वाद कायम? चंद्रकांतदादांच्या खेळीने वाढला सस्पेन्स

चंद्रकांतदादांच्या जागी अजितदादांची वर्णी :

अजित पवार सरकारमध्ये दाखल झाल्यापासून चंद्रकांत पाटील  आणि अजित पवार यांच्यातील सुप्त संघर्ष राजकारणात दिसून येत आहे. पालकमंत्रीपदाचा मुद्दा असो किंवा निधीवाटप असो या सगळ्यांत दोन्ही दादांत खटके उडाल्याचेही दिसून आले. अजितदादादांची नाराजी सध्या परवडणारी नाही म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडील पुण्याचे पालकमंत्री पद काढून घेऊन अजितदादांना देण्यात आले. तर चंद्रकांत पाटील यांना अमरावती आणि सोलापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले. अशात आज चंद्रकांत पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे या चर्चांनी पुन्हा जोर धरला.

Pune News : समर्थकाकडून बिल्डरला बेदम मारहाण; आमदार लांडगेंनी मागितली माफी

म्हणून अजितदादांना केले पालकमंत्री

मे महिन्यात शरद पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. यात सुमारे 400 कोटींच्या विकास कामांना मजुंरी देण्यात आली होती. परंतु, तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही अद्यापपर्यंत या निधीली मंजुरी देण्यात आलेली नाही. ही मंजुरी अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी पार पडली होती. मात्र, याला अजित पवारांकडे असलेल्या अर्थ खात्याकडून मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज चंद्रकांत पाटलांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली होती. अजित पवार यांनी मात्र पुण्यात प्रशासकीय बैठकांचा धडाका सुरूच ठेवला होता. त्यामुळेही चंद्रकांत पाटील अस्वस्थ वाटत होते. अखेर दोघांतील संघर्ष जास्त वाढू नये यासाठी अजित पवार यांनाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube