Pune News : पुण्यातील दोन्ही ‘दादां’चा वाद कायम? चंद्रकांतदादांच्या खेळीने वाढला सस्पेन्स

Pune News : पुण्यातील दोन्ही ‘दादां’चा वाद कायम? चंद्रकांतदादांच्या खेळीने वाढला सस्पेन्स

Pune News : अजित पवार सरकारमध्ये दाखल झाल्यापासून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील सुप्त संघर्ष राजकारणात दिसून येत आहे. पालकमंत्रीपदाचा मुद्दा असो किंवा निधीवाटप असो या सगळ्यांत दोन्ही दादांत खटके उडाल्याचेही दिसून आले. अजितदादादांची नाराजी सध्या परवडणारी नाही म्हणून चंद्रकांत पाटील यांचे पुण्याचे पालकमंत्री पद काढून घेऊन अजितदादांना देण्यात आले. त्यानंतर तरी दोघांतील सुप्त संघर्ष काही कमी होईल असे वाटत होते. मात्र, या दोघांतील वाद अजूनही कायम असल्याचाच प्रत्यय आज पुन्हा आला.

आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील गैरहजर राहिले. त्यांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील आज पुण्यात न थांबता त्यांनी अमरावती गाठली. परंतु, चंद्रकांतदादा या बैठकीला का हजर राहिले नाहीत?, दोघांतील संघर्ष अजूनही सुरुच आहे का?, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी आमदारांना १६ लाखांचा हप्ता मिळतो; संजय राऊतांचा दावा

पालकमंत्री पदावरून गच्छंती झाल्यानंतर दोन्ही दादा आज प्रथमच एकत्र येणार होते. त्यामुळे या संभाव्य भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली होती.  मात्र, अमरावती जिल्ह्यात बैठक असल्याने त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीला जाणे पसंत केले.  त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या गैरहजेरीची चांगलीच चर्चा रंगली होती.

म्हणून अजितदादांना केले पालकमंत्री

मे महिन्यात शरद पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. यात सुमारे 400 कोटींच्या विकास कामांना मजुंरी देण्यात आली होती. परंतु, तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही अद्यापपर्यंत या निधीली मंजुरी देण्यात आलेली नाही. ही मंजुरी अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी पार पडली होती. मात्र, याला अजित पवारांकडे असलेल्या अर्थ खात्याकडून मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज चंद्रकांत पाटलांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली होती. अजित पवार यांनी मात्र पुण्यात प्रशासकीय बैठकांचा धडाका सुरूच ठेवला होता. त्यामुळेही चंद्रकांत पाटील अस्वस्थ वाटत होते. अखेर दोघांतील संघर्ष जास्त वाढू नये यासाठी अजित पवार यांनाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

Devendra Fadnavis : आता ठाकरे-पवार माफी मागणार का? फडणवीसांचा हल्लाबोल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube