Devendra Fadnavis : आता ठाकरे-पवार माफी मागणार का? फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis : आता ठाकरे-पवार माफी मागणार का? फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis : कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय 2003 मध्ये झाला आहे. तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्यात आली होती. त्यानंतर 2010 साली अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना दोनदा कंत्राटी भरती काढण्यात आली. 2011 साली पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. 2013 सालीही अशीच भरती काढण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवारांच्या आशीर्वादाने त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackray) यांची सेना, शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरुवात केली ते काँग्रेस आता महाराष्ट्राची मागणार का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला.

‘मविआ’चं पाप आमच्या माथी नको, उबाठा सरकारचे कंत्राटी भरतीचे ‘जीआर’ रद्द; फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यात सध्या कंत्राटी भरतीवरून मोठा गदारोळ केला जातोय. पण, जे याचे दोषी आहेत ज्यांनी हे केलंय तेच आज जास्त आवाज करत आहेत. कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय 13 मार्च 2003 साली झाला आणि पहिली कंत्राटी भरती शिक्षण विभागात झाली होती, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी सांगितले.

कंत्राटी भरती हे काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप

कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे. त्यांच्या पापाचं ओझं आपण का उचलायचं असे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटी भरतीचे जीआर महाविकास आघाडी सरकारनेच काढले होते. त्यांच्याकडूनच राज्यातील युवकांची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.

ठाकरे-पवारांनी युवकांची माफी मागावी

महाविकास आघाडी सरकारच्या काळातच कंत्राटी भरतीचे जीआर काढण्यात आले होते. आता तेच या विरोधात आंदोलन करत आहेत. स्पष्टपणे त्यांच्याकडूनच युवकांची दिशाभूल केली जात आहे. खरेतर या प्रकरणात शरद पवार आणि उद्धव ठकरे यांनी युवकांची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत  सांगितले. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ललित पाटील प्रकरणात उद्धव ठाकरे आरोपीच्या पिंजऱ्यात; फडणवीसांकडून धक्कादायक खुलासे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube