ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी आमदारांना १६ लाखांचा हप्ता मिळतो; संजय राऊतांचा दावा
sanjay raut : गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे प्रकरण (Lalit Patil) चांगलचं गाजत आहे. राज्याचे मंत्रीही यात सहभागी असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. तर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यांनी मोठा दावा केला. ड्रग्ज प्रकणात कोणाला किती हप्ते जातात, याचा कागद माझ्याकडे आहे, असा दावा त्यांनी केला. या प्रकणात पोलिसांनी खुलेआम हप्ते जातात, असा आरोपही त्यांनी केला.
Devendra Fadnavis : आता ठाकरे-पवार माफी मागणार का? फडणवीसांचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आज इशारा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले, ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना गुरुवारी नाशिकमधून अटक करण्यात आली. ललित पाटीलच्या मैत्रीण विधानसभेपर्यंत आहेत. आणि त्यांना इथून हप्ता दिला जातो. काही मंत्री आणि आमदारांना हफ्त्यातून पैसे मिळतात त्याचे आकडे पोलीस सूत्रांनी मला दिले, असा आरोप राऊतांनी केला.
ते म्हणाले, या प्रकरणात सत्तेत बसलेल्या आमदारांचाही समावेश आहे. यामध्ये सहा आमदार सहभागी असून, एकाला १६ लाख रुपये हप्ता मिळतो. य प्रकणात मंत्र्यांवर आरोप झालेत, पोलिसांवर आरोप झाले. मात्र, शिवसेनेने मोर्चाची घोषणा करताच त्यांनी कारवाईला सुरुवात केली. आम्ही हा मोर्चा काढल्यानंतर पानटपऱ्यांवर धाडी पडल्या. अंमली पदार्थांचा व्यापार नाशिक आणि मालेगावपर्यंत एक-दोघांच्या ताब्यात नसून त्याचे धागेदोरे गुजरात आणि इंदूरपर्यंत पोहोचले आहे. गुजरातच्या ड्रग्जचे जाळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपर्यंत पोहोचल्याचे सर्वांनाच माहीत आहे. नाशिकमध्ये अमली पदार्थांचा एवढा मोठा व्यापार राजकीय आणि पोलिसांच्या पाठिंब्याशिवाय चालू शकत नाही, असं राऊत म्हणाले.
ते म्हणाले की, शिवसेनेच्या या इशारा मोर्चात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये, असा शासकीय आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे हजर होत्या. या मोर्चात शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये, असे आदेश गोऱ्हे यांनी दिले. तुम्ही कोणत्याही ड्रग्ज रॅकेटच्या सदस्या आहात का, तुमचा पाठिंबा आहे का या नशेच्या बाजाराला? तुम्ही कोणत्या अधिकाराने हा आदेश दिला? असा सवाल राऊतांनी केला.
काल नीलम गोऱ्हे यांनी ललित पाटील प्रकरणावरून संजय राऊतांवर टीका केली होती. ललित पाटीलने सेनेत प्रवेश केला तेव्हा संजय राऊत संपर्क नेते होते, आपल्या पक्षात कशी माणसं येतात, ते काय करतात, हे पाहणं त्यांची जबाबदारी होती, अशी टीका त्यांनी केली. यावरही राऊतांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, आम्ही त्यांना तपासून घेतले असते, तर आमच्यावर ही वेळ आली नसती. पाच पाच वेळा आमदार होऊन, आम्हाला ज्ञान देता. तेव्हाचे जे संपर्कप्रमुख होते, ते आता शिंदे गटात आहे, असं राऊत म्हणाले.