नगर तालुक्यातील देहरे गावात दारूचा महापूर, प्रशासनाचा कानाडोळा, गावकऱ्यांकडून आंदोलनचा इशारा

  • Written By: Published:
नगर तालुक्यातील देहरे गावात दारूचा महापूर, प्रशासनाचा कानाडोळा, गावकऱ्यांकडून आंदोलनचा इशारा

अहमदनगर : नगर तालुक्यातील देहरे (Dehre) या गावात अवैद्य हातभट्टी दारू विक्री (Sale of illegal liquor) जोमात सुरू आहे. त्यामुळे गावातील सामाजिक शांतता धोक्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) व पोलीस प्रशासनाचे (Police Administration) दुर्लक्षामुळे गावातील तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. त्यामुळं अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत देहरे गावातील अवैद्य हातभट्टी विक्रीला आळा घालण्याची मागणी नागरिकांसह महिलांनी केली आहे. यावेळी आक्रमक गावकऱ्यांनी थेट दारू रस्त्यावर फेकत प्रशासनाचा निषेध केला आहे.

Jitendra Awhad : करारा जवाब मिलेगा..! ‘त्या’ वक्तव्यावर आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा 

गावोगावी हातभट्ट्या असून राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला धाब्यावर बसून खुलेआम गावठी दारू तयार होते. तसेच विक्री केली जात असल्याचा आरोप गावातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. नगर तालुक्यात बहुतांश ठिकाणी हातभट्टी आणि गावठी दारूच्या उत्पादनासाठी जंगलाचा वापर केला जातो आहे. देहरे या गावांमध्ये अवैद्य हातभट्टी दारूचा महापूर झाला आहे. मात्र पोलिसांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी खुलेआम दारू विकली जात आहे.

देहरे गावामध्ये नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयाला पत्रव्यवहार करून देखील गावातील हातभट्टी दारू बंद करण्यात आलेली नाही. तसेच याच हातभट्टी दारूमुळे गावातील अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडलेले आहे. त्यामुळे गावातील महिला व पुरुषांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावामध्ये गावातून हातभट्टी दारू मुक्त होण्यासाठी हातभट्टी दारू ओतून दारूचे फुगे फोडून आंदोलन केले.

दारूचा महापूर मात्र प्रशासनाचा कानाडोळा
देहरे गावात मोठ्या प्रमाणात अवैद्य हातभट्टी दारू धंदे सुरू आहे. गावात गावठी दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने गावातील नागरिक व युवा पिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे. या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे कुटुंब संसार उध्वस्त झालेले आहे. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस या विभागाने कवळ बघ्याची भूमिका घेतल्याने लोकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. त्यामुळे गावातील गावठी दारू, हातभट्टी दारू तातडीने बंद करा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube